आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डहाणू बोट दुर्घटना: बाेटमालकासह तीन जण अटकेत; हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुमारे ३० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सायंकाळी डहाणू येथील बोट दुर्घटनेत  बुडालेल्या विद्यार्थ्यांची शोधमोहीम थांबवण्यात आली. या बोटीतून प्रवास करणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांपैकी ३२ जणांना तटरक्षक दलाने सुखरूप बाहेर काढले, तर ३ युवती समुद्रात बुडाल्या. दरम्यान, विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बोटीचा मालक धीरज अंभिरे, बोटचालक पार्थ अंभिरे आणि खलाशी महेंद्र अंभिरे यांच्यावर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करत अटक केली.
बातम्या आणखी आहेत...