आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार 7 आठवड्यांच्या उच्चांकावर, सलग आठव्या सत्रामध्ये तेजीची नोंद निफ्टी 47.75 अंकांच्या वाढीसह 10,528.35 वर बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली -सूक्ष्म-अर्थव्यवस्थेच्या पातळीवर सकारात्मक वृत्त आल्यानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजार सात आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. बाजारात सलग आठव्या सत्रात तेजी नोंदवण्यात आली. ही मागील वर्षी नोव्हेंबरनंतरची सर्वाधिक काळ राहिलेली तेजी आहे.  भारतीय शेअर बाजारात सलग आठव्या सत्रात तेजी नोंदवण्यात आली. घसरणीसह सुरुवात झाल्यानंतरही मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी तेजीसह बंद होण्यास यशस्वी झाले. मार्च महिन्यात घाऊक महागाई दर २.४७ टक्के नोंदवण्यात आल्यामुळे बाजाराच्या धारणेत सुधारणा झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ११३ अंकाच्या तेजीसह ३४,३०५ आणि निफ्टी ४८ अंकाच्या तेजीसह  १०,५८२ या पातळीवर बंद झाला. आज झालेल्या व्यवहारात बँक, एफएमसीजी, औषधी, वाहने आणि बांधकाम क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली. तर आयटी, धातू आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या क्षेत्रामध्ये घसरण झाली.

  
या आधी, अमेरिकेच्या नेतृत्वात ब्रिटन आणि फ्रान्सच्या वतीने सिरयावर मिसाइल्स हल्ला करण्यात आल्यामुळे बाजाराची धारणा नकारात्मक झाली असल्याचे दिसून आले. सेन्सेक्स २४८ अंकांच्या घसरणीसह ३३,९४५ या पातळीवर उघडला.

रुपया सहा महिन्यांच्या नीचांकावर  
जगभरातील इतर प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने तसेच आयातकांनी डॉलर िवक्री केल्यामुळे सोमवारी व्यवहारादरम्यान रुपया २९ पैसे स्वस्त झाला. एक डॉलरची किंमत ६५.४९ रुपयांवर पोहोचली. ही रुपयाची सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीतील नीचांकी पातळी आहे. याआधी रुपया मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या पातळीवर होता. मागील दोन सत्रांत रुपया ११ पैशांनी मजबूत झाला होता. मात्र, सोमवारी झालेल्या घसरणीमुळे ही मजबुती धुऊन टाकली. मागील शुक्रवारी रुपया सहा पैशांच्या आणि गुरुवारी पाच पैशांनी मजबूत झाला. भारताची व्यापारी तूट वाढल्याने आणि जगात भूराजकीय तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला. आशियाई चलनात भारतीय रुपयांत सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. 

या कारणांमुळे तेजी  
- हवामान विभागाने ९७ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.  
- घाऊक महागाई दर मार्च मध्ये २.४७ % राहिला.  
- किरकोळ महागाई दर मार्चमध्ये कमी होऊन ४.२८ टक्के नोंदवण्यात आला.  
- फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनात ७.१ टक्क्यांच्या दराने वाढ झाली.  
- कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे.  

 

मार्चमध्ये घाऊक महागाई दरात घसरण, २.४७ टक्के
मार्च महिन्यात घाऊक महागाई दर २.४७ टक्के नोंदवण्यात आला. मागील वर्षी म्हणजेच मार्च २०१७ मध्ये घाऊक महागाई दर २.४८ टक्के नोंदवण्यात आला होता, तर मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०१८ मध्ये घाऊक महागाई दर २.४८ टक्के नोंदवण्यात आला होता. मार्च महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. यामुळे “फूड आर्टिकल ग्रुप’चा निर्देशांक ०.४ टक्क्यांच्या घसरणीसह १३७.२ टक्के नोंदवण्यात आला, तर दुसरीकडे मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी २०१८ मध्ये हा १३७.८ टक्के नोंदवण्यात आला होता. मार्च महिन्यात अंडी, हरभरा, चहा, काॅफी, पोल्ट्री चिकन, मसाले, राजमा, मसूर, बाजारी, फळे आणि भाज्यांच्या दराव्यतिरिक्त मिंटच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे, तर ज्वारी, मूग, गहू आणि तांदळाच्या किमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.

  
किमतीत घट 

मार्च महिन्यात निर्मित वस्तूंमधील घाऊक महागाई दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. या वस्तूंमधील महागाई दर कमी होऊन ३.०३ टक्के नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी या समान कालावधीचा विचार केल्यास निर्मिती वस्तूंमधील घाऊक महागाई दर ३.२२ टक्के नोंदवण्यात आला होता, तर मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये देशातील निर्मिती क्षेत्रात वाढ नोंदवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...