आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ना देवगड, ना रत्नागिरीचा,हापूस अख्ख्या कोकणचा;पेटंट मिळाले दोन भागांतील वाद मिटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय पेटंट विभागाने हापूस आंब्याच्या पेटंट वादात गुरुवारी महत्त्वाचा निकाल दिला. कंट्रोलर जनरल ऑफ पेटंटने म्हटले की, पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत कोकणाच्या कोणत्याही कोपऱ्यात पिकणारा आंबा हापूस आहे. महाराष्ट्रात देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूसला २०१७ मध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) प्रमाणपत्र देण्यात आले होते. यानंतर या दोन्ही भागांनी हापूस फक्त आपलाच असल्याचा दावा करत पेंटटसाठी अर्ज केला होता.

 

जीआय हे भौगोलिक कृषी उत्पादन व नैसर्गिक वस्तू आहे, जी त्या भागाची बौद्धिक संपत्ती समजली जाते. मात्र हापूसचा वाद इतका वाढली की शेवटी पेटंट विभागाला निकाल देऊन देवगड, रत्नागिरीसह संपूर्ण कोकण क्षेत्राच्या आंबा उत्पादकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यानंतर वलसाड, कर्नाटक, चेन्नईचे उत्पादक आंबा हापूसच्या नावाने विकू शकणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...