आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'..दांडूका देखा नही क्या हमारा?', नव्या कार्टूनद्वारे राज ठाकरेंचा संघ, भागवतांवर हल्लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सरकारकडून विकासाचा बराच बॅखलॉग शिल्लक असला तरी राज ठाकरेंनी मात्र टीकेचा बॅकलॉग भरून काढण्याचे चांगलेच मनावर घेतले आहे. राज ठाकरे यांनी कार्टूनच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणे सुरुच ठेवले आहे. नुकतेच राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर आता मोहन भागवत यांच्या लष्करासंबंधीच्या वक्तव्यावरून भागवत आणि संघाला लक्ष्य केले आहे. 

 

राज ठाकरेंनी अशी केली टीका..
मोहन भागवत यांनी लष्कराला जवान तयार करायला सहा ते सात महिने लागतात. पण गरज असल्यास संघ तीन दिवसांत जवान तयार करू शकतो असे भागवत यांनी म्हटले होते. त्यावर राज ठाकरेंनी सीमेवर जवानाऐवजी संघाचे स्वयंसेवक तयार आहेत, असे दाखवले आहे. त्यांना घाबरून पाकचे अधिकारी आणि दहशतवादी पळून जात आहेत असे त्यांनी कार्टूनमध्ये दाखवले आहे. या व्यंगाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी संघांसह भागवत यांच्यावरही टीका केलेली आहे. 


मोदी-शहा यांना करतात लक्ष्य...
राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी कार्टूनमध्ये नरेंद्र मोदींच्या फसव्या योजना आणि जुमलेबाजी यावरही एक व्यंगचित्र काढले होते. त्यात अमित शहादेखिल दाखवण्यात आले होते. राज ठाकरे अनेकदा मोदी-शहा जोडीवर कार्टूनद्वारे टीका करत असल्याचे दिसून आले आहे. राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी माझा कार्टूनचा अनुशेष शिल्लक आहे, पण तो लवकरच भरून काढेल असे म्हटले होते. त्यानंतर ते एकापाठोपाठ त्यांचे हे शस्त्र वापरत आहेत. 


राज ठाकरेंचे यापूर्वीचे काही कार्टून पाहा पुढील स्लाइड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...