आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला तर मंत्रिपदासह भाजपचीही साथ सोडेन- आठवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बहुजन भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील दलित ऐक्यासाठी पुढाकार घेतल्यास आपण मंत्रिपदच काय तर भाजपची साथ सोडायला मागेपुढे पाहाणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्यास आपण तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्‍यासाठी स्वत: मोदींनी पुढाकार घ्यावा...

भाजप आणि शिवसेनेमधील बिघडलेल्या संबंधांवर बोलताना उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे अाठवलेंनी सांगितले. विशेष म्हणजे, आपण खुद्द मध्यस्थी करणार असल्याचेही ते म्हणाले.  

 

शिवसेनेने माझ्यासाठी दक्षिण-मध्य मुंबई सोडावी...

रामदास आठवले यांनी लोकसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी भाजप व शिवसेवा युती व्हायला हवी. शिवसेनेने माझ्यासाठी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली.

 

आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार...

दलितांवर अत्याचारायंविरुद्ध मी राजीनामा द्यावी, अशी काँग्रेस मागणी करते आहे. मात्र, आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असताना त्यांच्या किती मंत्र्यानी राजीनामे दिले होते?  असा सवाल आठवले यांनी विरोधकांना केला आहे.

बातम्या आणखी आहेत...