आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील अनधिकृत होर्डिंग्ज 40 दिवसांत काढा,अन्‍यथा अधिकाऱ्यांवर कारवाई: हायकोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सर्व शहरांतील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, स्काय साइन्स २३ फेब्रुवारीपर्यंत काढावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. गेल्या वर्षी कोर्टाने जानेवारीपर्यंत सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारच्या िवनंतीवरून कोर्टाने मुदत वाढवून दिली आहे.


न्यायमूर्ती अभय अोक व ए. ए. सय्यद यांनी सर्व महापालिका व वॉर्ड अधिकाऱ्यांना २१ निर्देश दिले. तसेच शहराच्या प्रत्येक वाॅर्डातील अधिकाऱ्यांसोबत कारवाईदरम्यान दोन सशस्त्र पाेलिस देण्याचेही आदेशही  पोलिस आयुक्तांना दिले.  तसेच या नियमांची अंमलबजावणी न झाल्यास आम्ही संबंधित सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टाच्या अवमाननेची कारवाई करू, असा सज्जड इशाराही कोर्टाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...