आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा: आठ दिवसापूर्वी प्रेमविवाह केलेल्या तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- केवळ आठ दिवसापूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरूणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साता-यात घडली आहे.

 

आकाश मांढरे (वय- 23, रा. निरसाळे, वाई) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आज सकाळी नऊ वाजता आकाशने परिसरातील झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले.

 

आकाशचे आठ दिवसापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर मागील चार-पाच दिवसापासून तो पोलिस ठाण्यात चकरा मारत होता. त्यामुळे कुटुंबियांच्या विरोधामुळे त्याने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. या प्रेमविवाहाला मुलाच्या घरच्यांचा विरोध होता की, मुलीच्या की दोन्ही कुटुंबियांचा याची माहिती घेतली आहे. त्यानंतर आकाशने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होईल. 

बातम्या आणखी आहेत...