आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन; लिलावती रुग्‍णालयात घेतला अखेरचा श्‍वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते, माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पतंगराव कदम (७२) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मूत्रपिंडाच्या अाजारामुळे त्यांच्यावर ३ मार्चपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यांना अमेरिकेला हलवण्याचेही प्रयत्न सुरू हाेते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांनी गुरुवारी रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली हाेती. पतंगरावांच्या पश्चात पत्नी विजयमाला, मुलगा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ज्येष्ठ बंधू आमदार मोहनराव कदम यांच्यासह माेठा परिवार अाहे. कदम सात वेळा आमदार म्हणून निवडून आले  हाेते. शनिवारी सकाळी १० वाजता पुण्याच्या भारती विद्यापीठात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल तर सायंकाळी सांगली जिल्ह्यातील वांगी येथील साेनहिरा कारखान्याच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

वयाच्या 19 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना-

- पतंगराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात प्राथमिक शिक्षण व कुंडलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले.

- पुढे 1961 साली पुण्यात आले. शिक्षक म्हणून काम करताना काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगत 1964 साली वयाच्या 19 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
- यानंतर समाजकारण व राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
- 1964 साली वसंतदादा पाटील यांनी त्यांना एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. सोबतच त्या काळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करत भारती विद्यापीठाचे रोपटे वाढवले.
- 1980 साली काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून ते अपक्ष उभा राहिले मात्र केवळ अडीचशे-तीनशे मतांनी पराभूत झाले.
- मात्र, त्यांनी हार मानली नाही. पुन्हा जोमाने काम करू लागले. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना 1985 च्या निवडणुकीत तिकीट दिले व ते निवडून आले. तेव्हापासून सलग सात वेळा पतंगराव कदम विधानसभेत निवडून गेले.

 

असे राहिले राजकीय करियर-

- 1985 ते 2018 (मृत्यूपर्यंत) ते भिलवडी वांगी आणि  पलूस-कडेगाव या दोन विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले.

- जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री

- मे 1992 ते 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)

- ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री

- नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री

प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

- डिसेंबर 2008 पासून - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण मंत्री

- मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महसूल मंत्री

- नोव्हेंबर 2009 पासून- वन मंत्री

- 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - वन मंत्री, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन
- ऑक्टोबर 2014 पासून आमदार. पतंगराव कदम यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांना दोन-तीन संधी मिळाली होती मात्र प्रत्येकी वेळी त्यांची संधी हुकली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या साेबत पतंगराव कदम...  

बातम्या आणखी आहेत...