आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणून बाळासाहेबांनी स्थापन केली मराठीच्या मुद्द्यांवर भूमिपुत्रांठी लढणारी ‘शिवसेना’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते - ‘शिवसेना’!


संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अवघ्या तीनच महिन्यात सुरू झालेल्या `मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकामधून व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजातली अन् तरूणांच्या मनातली हीच अस्वस्थता टिपायला सुरूवात केली. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱयातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम बाळासाहेब करत होते. त्याला लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागला. त्यांच्या भोवती मराठी तरूणांची गर्दी जमायला लागली होती. मराठीच्या मुद्दय़ावर भूमिपुत्रांठी कायमस्वरूपी लढणारी एखादी संघटना असावी असा विचार पुढे येऊ लागला.


‘मार्मिक’मधून मुंबईतील आस्थापनांतील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या, त्या सगळ्या परप्रांतीयांच्या होत्या. मराठी माणसास त्यात स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व खासगी कंपन्यांमध्ये दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. ‘मार्मिक’मधील आपल्या लिखाणाने बाळासाहेबांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक मराठी माणसे ‘मार्मिक’च्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा आणि वेदना मांडायचे. ही मराठी माणसांची गर्दी पाहून प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांना म्हणाले, हे एवढे लोक येतात, याला काही ऑर्गनाइज्ड स्वरूप द्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टीला, चळवळीला संघटनेचा आकार द्या. तरच त्यातून काहीतरी ठोस घडेल. नाहीतर ही जागृती फुकट जाईल. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना काढणे, हा एकच मार्ग त्यावर आहे.

 

संघटना काढायची!

दादा (प्रबोधनकार ठाकरे) म्हणाले, ‘कधी?’
बाळासाहेब म्हणाले, ‘आता.’ 

नारळ आणून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सहदेव नाईकने तो फोडला.

बाळासाहेब म्हणाले, ‘नाव काय ठेवायचे?’
दादा म्हणाले, ‘त्यात विचार कसला करता? शिवसेना.’


तो दिवस होता १९ जून १९६६! मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी ‘शिवसेना’ स्थापन झाली. १९ जून १९६६ रोजी सकाळी ९.१५ वाजता शिवछत्रपतींच्या जयजयकारात शिवसेनेची नोंदणी सुरू झाली. सहदेव नाईक यांनी जयजयकार करून नारळ फोडला व प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेचे तक्ते देण्यास सुरुवात झाली. एका तासात दोन हजार तक्ते संपले. दोन दिवसांत दहा हजारांच्यावर नोंदणी झाली. २६ जून १९६६च्या ‘मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा ‘वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे चित्र आणि ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते- ‘शिवसेना!’ छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत! महाराज भवानी मातेचे प्रखर भक्त होते. ‘वाघ’ हे भवानीचं वाहन म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह ‘वाघ’ असावं, असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा! शिवसेनेचे सार व्यक्त होणाऱ्या बोधचिन्हाला खुद्द बाळासाहेबांनी साकारले होते...


पहिला दसरा मेळावा
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरले होते. िवशेष म्हणजे, दादर रेल्वेे स्थानकावरून शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते फुलून गेले होते. शाहीर साबळे यांच्या गाण्याने मेळाव्याची सुरुवात झाली. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रबोधनकार म्हणाले, ठाकरे कुटंुबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला, या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे!


आईसाठी बांधला मातोश्री!
दादर परिसरात छोट्याशा जागेत ठाकरे कुटंुब राहात होते. परंतु सर्वांना एकत्र राहता येईल, अशा जागेच्या शोधात ठाकरे कुटंुबीय होते. वांद्रे पूर्व येथे कलानगर परिसरात पाच एक दशकांपूर्वी काही प्लाॅट सरकारकडून िवकसित करण्यात येत होते. त्यापैकी एका प्लाॅटवर बाळासाहेबांनी बंगला बांधला. खरे तर आईसाठी स्वत:चं घर बांधेन, ही बाळासाहेबांची इच्छा होती. मात्र ज्या आईसाठी, रमाबाई यांच्यासाठी, ते घर बांधणार होते, ती आई हयात नसल्याने त्यांनी बंगल्याचे नामकरण केले, ‘मातोश्री’! खास म्हणजे, हे नावही त्यांना सुचवले, ते प्रबोधनकारांनीच...

 

पुढील स्लाइडवर वाचा, शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याची मार्मिकमधील जाहिरात.. 

 

बातम्या आणखी आहेत...