आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाड : सावळ्या रंगामुळे चिडवत होते सगळे, त्यामुळे महिलेने जेवणात मिसळले होते विष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - महाड येथे 18 जून रोजी घडलेल्या विषबाधा प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नातेवाईक सावळ्या रंगावरून चिढवत असल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून ज्योती सुरवसे हिनेच सर्वांच्या जेवणात विष मिसळले होते. सुमारे 120 लोकांना त्याची विषबाधा झाली आणि 5 जणांचा यात मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चिमुरड्यांचाही समावेश होता. 


रायगडच्या महाडमध्ये सोमवारी वास्तुशांतीच्या भोजनातून सुमारे 120 लोकांना विषबाधा झाली होती. त्यात 5 जणांचा मृत्यूही झाला होता. सुभाष माने यांच्या घरी झालेल्या वास्तुशांतीमध्ये हा प्रकार घडला. यामध्ये विषबाधा झालेल्या सर्वांना लगेचच उपचारासाठी दाखल करण्यात आले. अनेक लोकांना उलट्या आणि इतर त्रास झाल्याने लगेचच उपचारासाठी त्यांना दाखल केले. पण यामध्ये तीन चिमुरड्यांसह 5 जणांनी जीव गमावला. 


असा लागला छडा 
पोलिसांनी या घटनेचा प्राथमिक तपास सुरू केला. तपासामध्ये पोलिसांना हे समजले की सर्व लोकांना झालेली विषबाधा ही किटकनाशकाच्या वापरामुळे झाली आहे. हे समजल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. त्यांना वास्तुशांतीच्या कार्यक्रमाशी संबंधित सर्वांची चौकशी सुरू केली. या चौकशीत पोलिसांना ज्योती सुरवसे हिच्यावर संशय आला होता. तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने स्वतः गुन्हा मान्य केला.  


वरणात टाकले किटकनाशक 
ज्योतीने पोलिसांना सांगितले की, ज्योतीला नातेवाईक आणि गावातील काही लोक तिच्या रंगावरून चिढवायचे. तसेच तिला स्वयंपाक येत नसल्यानेही तिला बोलायचे. ज्योतीचे लग्नही मोडलेले होते. त्यासाठीही ही गावातील लोक आणि नातेवाईकांनाच जबाबदार समजत होती. या सर्व रागातून वास्तुशांतीच्या स्वयंपाकातील वरणामध्ये थेट किटकनाशक टाकले, असे ज्योतीने सांगितले. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...