आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा आदेश : दलित वस्तीत मुक्कामी जा; राज्यातील स्थिती : फक्‍त 1 खासदार मुक्कामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र - दलितांवरील हल्ले, दलित आणि सवर्णांमध्ये होत असलेले जातीय संघर्ष आणि अत्याचारविरोधी कायद्यातील बदलांच्या न्यायालयाच्या निर्णयाने दलितांच्या मनात भाजपबद्दल निर्माण झालेली अढी या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने १४ एप्रिल ते ५ मेदरम्यान दलितांच्या वस्तीत किमान दोन दिवस मुक्काम करण्याचा कार्यक्रम आखण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच पक्षातील खासदारांना केले होते.

 

६ एप्रिल या भाजपच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईत पक्ष संघटनेच्या बैठकीत त्यांनी खासदारांना हा कार्यक्रम दिला होता.  मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या या आवाहनास वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. राज्यातील २१ पैकी १९ खासदारांशी संपर्क साधून तयार केलेला हा वृत्तांत...

 

दलित वस्तीत गेलेले खासदार म्हणाले
खासदार नितीन गडकरी : नागपूरमधील दलित वस्तीत झोपडपट्टीधारकांना पट्ट्यांच्या वाटप कार्यक्रम घेतला.  
सुनील गायकवाड : केंद्रीय पथकासोबत मतदारसंघातील गावात गेलो, हेळंब आणि गांजूरमध्ये मुक्काम केला. लोकांंपर्यंत योजना पोहोचवल्या.  
पूनम महाजन : बुद्धविहारात कार्यक्रम घेतले, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.  
संजय धोत्रे : मोरझाडी गावात कार्यक्रम घेतला. महादेव नावकर यांच्या कुटुंबासोबत भोजन  केले. गावातील लोकांना योजनांची माहिती दिली.  
अशोक नेते : महागाव, नागेपल्ली, आडपल्ली गावात कार्यक्रम घेतला. लोकांना योजनांची माहिती दिली. योजनांपासून वंचितांना तत्काळ लाभ दिला.  
रामदास तडस : कोळना, कवठा गावांमध्ये गेलो. मुक्काम केला नाही, पण श्रमदान केले. डॉ. कवाडे यांच्याकडे भोजन केले.
 
वस्तीत न गेलेले खासदार म्हणाले
रावसाहेब दानवे : अजून जमले नाही, पुढल्या महिन्यात चांदई टेपली आणि कोठा कोळी या गावात जाणार आहे.  
दिलीप गांधी : मी दिल्लीत होतो म्हणून जमले नाही. पुढल्या महिन्यात जाईन. माझे सगळे कार्यकर्तेच दलित आहेत.  
कपिल पाटील : लग्नसराईचा हंगाम असल्याने जमले नाही. १२ मेनंतर जाणार.  
प्रीतम मुंडे : विधान परिषदेची आचारसंहिता लागल्याने कार्यक्रम घेता आले नाहीत.  
गोपाळ शेट्टी : माझ्या मतदारसंघात दलित वस्ती नाही.  
हरिश्चंद्र चव्हाण : परदेश दौऱ्यावर होतो. मुक्काम करता आला नाही. कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. 
 
महाराष्ट्र : प्रत्यक्षात काय झाले  
- फक्त तीन खासदार दलित वस्तीच्या गावांमध्ये पोहोचले
- फक्त दोघांनी दलित कुटुंबासोबत भोजन केले
- दोघांना गावांची नावे सांगता आली नाहीत
- दोन खासदारांनी त्यांच्या शहरी मतदारसंघातील दलित वस्तीत कार्यक्रम घेतले
- १५ खासदारांनी पंतप्रधानांचा कार्यक्रम पाळलाच नाही
- पैकी १० खासदारांनी न जाण्याची कारणेही टाळली
 
ही दिली कारणे   
दिल्लीचा दौरा , लग्नसराईचा मोसम, मतदारसंघात दलित वस्ती नाही, पुढील आठवड्यात जाणार आहे, मतदारसंघात दलित वस्ती नाही, परदेशी दौरा सुरू आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय म्‍हणाले मोदी... 
बातम्या आणखी आहेत...