आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजार गावे दुष्काळमुक्त, तरीही टँकर्स दुप्पट; जलयुक्त शिवार अभियानावर प्रश्नचिन्ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून ३ वर्षांत १२.३० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून ११ हजार गावे टँकरमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री करत अाहेत. मात्र दुष्काळग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. 


सध्या राज्यात ६०१ गावे व १५८ वाड्यांवर ६११ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. याच महिन्यात मागच्या वर्षी ३५७ गावे आणि ८४६ वाड्यांना एकूण ३७३ टँकर्स पाणीपुरवठा करत होते. म्हणजेच जलयुक्त शिवार अभियान योजनेतून दरवर्षी ५ हजार गावे टंचाईमुक्त होत असतानाच टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्याही वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान चालू केले. त्यासाठी लोकसहभागातून ५६० कोटींचा निधी उभा केला. सरकारने यावर साडेपाच हजार कोटी रुपये खर्च केले. दरवर्षी ५ हजार गावांत जलयुक्तची कामे केली जातात. त्यानुसार २०१९ पर्यंत ४२ हजार गावांपैकी २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याची योजना आहे. अशा प्रकारे ११ हजार ९९४ गावे टँकरमुक्त व दुष्काळमुक्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पुढच्या वर्षीपर्यंत २५ हजार गावे पूर्णपणे दुष्काळमुक्त होतील, असा त्यांचा दावा आहे. पहिल्या पावसाळ्यात जेव्हा जलयुक्त अभियानातून खोलीकरण व रुंदीकरण केलेले नाले तुडुंब भरलेले असतात तेव्हा त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करून सरकार पाणीसाठ्याचा ताळेबंद जाहीर करत दुष्काळमुक्तीचे ढोल बडवत असते. मात्र उन्हाळ्यात हेच चित्र उलटे होत असल्याचे पाणीपुरवठा विभाग जारी करत असलेल्या टँकरच्या साप्ताहिक स्थितीदर्शक अहवालाने आणले आहे. 


या योजनेत पाणी मुरण्यापेक्षा पाणी दिसण्यावर जास्त भर आहे, असा पाणलोट क्षेत्रातील तज्ज्ञांचा आक्षेप आहे. अमुक इतके टीएमसी पाणी अडवले, असा या योजनेत केल्या जाणाऱ्या दाव्याचा शास्त्रीय अभ्यास शासनाने जाहीर करावा, अशी तज्ज्ञांची मागणी आहे. दुष्काळमुक्त गावांची संख्या वाढत असतानाच टँकरची वाढती संख्या पाहून तज्ज्ञांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे स्पष्ट होत असून या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, टंचाईग्रस्‍त गावे व टँकर्सची संख्‍या... 

बातम्या आणखी आहेत...