आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील परिवहन कार्यालये दलालमुक्त करणार: परिवहन मंत्री दिवाकर रावते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालये (अारटीअाे) दलालमुक्त केली जातील तसेच बीड येथील उपप्रादेशिक कार्यालयातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, अशी घाेषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी साेमवारी विधान परिषदेत केली. विनायक मेटे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली हाेती. बीडमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून हे दलालच अधिकाऱ्यांच्या सह्या करतात, असा अाराेप करून परिवहन कार्यालयाचे वाभाडे काढले. यावर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी मान्य केले की यापुढे राज्यात परिवहन कार्यालयात दलाल दिसणार नाहीत. सर्व कामे अाॅनलाइन केली जातील.  बीड परिवहन कार्यालयात पदे कमी असल्याने त्या ठिकाणी कामाचा निपटारा हाेत नाही. ही भरती करण्यासाठी अापले प्रयत्न सुरू असून प्रशासकीय पातळीवर भरती करण्याबाबत कार्यवाही केली जार्इल, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना काही कारणे पुढे करून भरती प्रक्रिया पुढे ढकलली जाते. याचा अनुभव अाल्याचे देखील त्यांनी मान्य केले. तरीदेखील यातील काही जागा निश्चित भरल्या जातील, असे अाश्वासन रावते यांनी दिले.  


ट्रॅक्टर ट्राॅलीचे पासिंग केले जात नाही, याला यातील दलाल आणि इतर जबाबदार अाहेत. त्यांना राज्यातील अधिकाऱ्यांचाच पाठिंबा असल्याची बाब विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास अाणून दिली. यावर दखल घेण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या वेळी दिले.   

बातम्या आणखी आहेत...