आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.60 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर उपचारात 50 टक्के सवलत; 1 लाखाची उत्पन्न मर्यादा वाढवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धर्मादाय रुग्णालयात यापुढे ८५ हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णांना मोफत तर १ लाख ६० हजारापर्यंत उत्पन्न असलेल्या रुग्णांना ५० टक्के सवलतीत उपचार मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच हा निर्णय घेतला.  २३ फेब्रुवारी रोजी विधी व न्याय विभागाने धर्मादाय रुग्णालयातील निर्धन रुग्णांना ५० हजारांपर्यंतचे उपचार करण्याचे आदेश होते. ती मर्यादा ८५ हजार करण्यात आली आहे. पूर्वी १ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णावर दुर्बल घटक या अन्वये ५० टक्के सवलतीत उपचार होत. त्यामध्ये नवीन शासन निर्णयानुसार १ लाख ६० हजार रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीस सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत.

३२१ कोटी निधी : राज्याच्या इतिहासात आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ वर्षांमध्ये ४२ कोटीची रुग्णांना मदत देण्यात आली. फडणवीस सरकारच्या काळात त्यामध्ये भरीव वाढ झाली. ३ वर्षांच्या कार्यकाळात ३२१ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...