आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी दारुच्या नशेत आईला केली मारहाण, मुलाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन केले Suicide

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वडिलांनी दारुच्या नशेत आईला बेदम मारहाण केल्यामुळे नाराज झालेल्या मुलाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत उघड झाली आहे. पोलिसांनी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुलाच्या वडिलांना आणि कुटंबातील काही सदस्यांना अटक केली असून त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आपल्या कुटुंबियांसोबत डोंबिवलीतील आत्मश्रृष्टी सोसायटीत रहात होता. वडिलांना दारुचे व्यसन असल्याच्या कारणावरुन आईवडिलांमध्ये सतत भांडणे व्हायची. वडील रोज दारु पिऊन आईला मारहाण करायचे. या प्रकाराला मुलगा कंटाळला होता त्याने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी त्याला जुमानले नाही. शेवटी त्याने एका महिला संघटनेची मदत घेतली. ही बाब त्याच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना रुचली नाही. त्यांनी त्याला यावरुन टोमणे मारत छळ करायला सुरुवात केली. आणि यातूनच त्याने आत्महत्या केली. 

 

पोलिस अधिकारी  व्ही. एम पवार यांनी सांगितले, सुरुवातीला आम्ही या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र मुलाच्या आईने आम्हाला वडिलांकडून त्याच्यावर होणाऱ्या मानसिक छळाविषयी सांगितले. वडिलांचे व्यसन, आई वडिलांमधील भांडणे, वडिलांची आईला मारहाण या सर्वाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आल्याने आम्ही या प्रकरणी उमेश तेलंगला व त्याच्या कुटुंबातील काही जणांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...