आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A 2 Days To Go, Bandra Bypoll Campaign At Last Stage

पोटनिवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात: फडणवीस, शरद पवारांची आज मुंबईत सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शिवसेनेसह सर्वच पक्षांनी प्रचाराचे जबरदस्त रान पेठवले आहे. शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उदया जाहीर सभा होणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे ही आज जाहीर सभा घेणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी एमआयएमनेही जोरदार प्रचार केला आहे. एमआयएमचे नेते खासदार असाऊद्दीन व अकबरूद्दीन हे ओवेसी बंधू मुंबईत रोजच सभा घेत आहेत.

वांद्रे पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी (11 एप्रिल रोजी) मतदान होत आहे. प्रचारासाठी गुरुवारी हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे दोन दिवस राहिल्याने सर्वच पक्षांनी प्रमुख नेत्यांची जाहीर सभा ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज सायंकाळी साडेसात वाजता वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक बांधकाम विभाग मैदानावर होणार आहे. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता खार पूर्वमधील जवाहर नगरात होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आज होणा-या सभेला परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार, रिपाइंचे अविनाश महातेकर, विभागप्रमुख अनिल परब तर उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणा-या सभेला शिक्षणमंत्री विनोद तावडे, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदी उपस्थित राहणार आहेत.