आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 Attack: कसाबने झाडलेली गोळी अजूनही तिच्या पोटात, वाचा तिची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आठ वर्षापूर्वी मुंबईवर झालेेल्या सर्वात मोठा दहशतवादी हल्ला अर्थात 26/11च्या हल्ल्याच्या जखमी आजही ओल्या आहेत. या हल्ल्यात 166 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

26/11च्या हल्ल्यात कोणी हात गमावला तर कोणी पाय. कोणा-कोणाला तर आयुष्यभरासाठी अंपगत्व आले आहे. काही जण तर असेल आहेत की, ते आजही जागेवरून उठू शकत नाही. या घटनेची एक साक्षीदार आहे. पूनम सिंग असे या महिलेचे नाव. पूनम सांगतात की, आजही तिला 'ती' काळरात्र आठवली तर त्यांची झोप उडून जाते.

कसाबने झाडलेली गोळी अजूनही पूनमच्या पोटात...
26/11 च्या रात्री मुंबईत राहाणार्‍या पूनम सिंग सीएसटीवरून घराकडे निघाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी अचानक दहशतवादी अजमल कसाब याने अंदाधूूंद गोळीबार केला. त्यातील एक गोळी पूनम यांंच्या पोटात शिरली, ती आजही त्यांच्या पोटात आहे. पूनम यांच्यासोबत मुलगा मुलगा सचिनही होता. त्याच्या हाताला गोळी लागली होती. आज तो पूर्णपणे बरा झाला आहे. मात्र, पूनम यांच्या पोटातील गोळी आजही तशीच आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गोळी काढली तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल.

सरकारने जखमी पूनम यांच्या उपचारासाठी केवळ अडीच लाख रूपये मदत म्हणून दिले. पण, त्यांच्या उपचारासाठी आजपर्यंत तब्बल 10-12 लाख रूपयांहून जास्त खर्च झाला आहे. भविष्यातही पूनम यांना पोटात रुतलेली गोळी कायम त्रासदायक ठरणार असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

कसाबने सीएसटीवर केलेल्या गोळीबारात शेरुही झाला होता जखमी...वाचा पुढील स्लाईडवर....बघा फोटो....
बातम्या आणखी आहेत...