आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल’पुन्हा मुश्किलीत; संभाजी ब्रिगेडचा विराेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कोल्हापूर- करण जोहर दिग्दर्शित ‘एे दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या मागे लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असल्याने मनसेने सुरुवातीला प्रचंड विराेध केला, नंतर मात्र विराेधाची तलवार म्यान केली. त्यामुळे शुक्रवारी कसाबसा हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र अाता संभाजी ब्रिगेड व पतित पावन संघटनेने या चित्रपटाला विरोध दर्शवत शुक्रवारी निदर्शने करत जोरदार निदर्शने केली.

कल्याणमधील सर्वोदय चित्रपटगृहाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिला. पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. कोल्हापूरमध्येही पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला. तर जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असेच अांदाेलन केले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष आहे. ‘एे दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका आहे. त्यामुळे मनसेने या चित्रपटाला विराेध केला हाेता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यास आमच्या स्टाइलने उत्तर देऊ, असा इशाराही निर्मात्यांना दिला हाेता. हे संकट दूर करण्यासाठी मुकेश भट यांच्यासह करण जोहर यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतरही मनसेचा विरोध कायम होता. त्यानंतर मात्र करण जोहर, मुकेश भट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक घेतली. त्यात लष्काराला पाच कोटी रुपये देण्याच्या व यापुढे एकाही पाकिस्तानी कलाकारांनी भूमिका न देण्याच्या अटीवर मनसेने चित्रपटाचा विरोध मागे घेतला. मात्र, मुकेश भट यांनी बैठकीत पाच कोटी रुपये देण्याचे काहीच ठरले नसल्याचे सांगितले. तर पाच काेटी देण्याचा अापला प्रस्ताव नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनीही हात झटकले हाेते. या वादावर पडदा पडल्यानंतर मात्र अाता पुन्हा या चित्रपटाला विराेध सुरू झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...