आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Huge Financial Power Backs Modi Says Sharad Pawar At Mumbai

मिडियाला आतून पैसे, म्हणूनच नरेंद्र मोदींची थेट भाषणे- शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काही लोकांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी हवे आहेत. त्यामुळेच भाजप पक्षाच्या नावावर नव्हे तर मोदींच्या नावावर मते मागितली जात आहेत. मिडियाला आतून पैसे दिल्यानेच बहुतेक वाहिन्या मोदींची थेट भाषणे रोज टीव्हीवर दाखवत आहेत, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांनी आज ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी डोंबिवली येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, 'इंदिरा गांधी, पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वतःसाठी कधी मते मागितली नव्हती, पण मोदी स्वतःसाठी मते मागत आहेत. देशाच्या पंतप्रधानाचे भाषण आपल्याला रोज ऐकायला मिळत नाही. पण पंतप्रधानपदाचे उमेदवार समजणाऱ्या मोदींचे भाषण मात्र रोज टीव्हीवर पाहायला मिळते. मोदींच्यामागे एक मोठी अर्थशक्ती काम करत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याच काम मोदी करत आहेत. अशा वृत्तीचा माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर बसता कामा नये असेही पवार यांनी डोंबिवलीतील सभेत मत मांडले.
मागील काही दिवसापासून पवारांनी मोदी व भाजपला लक्ष्य केले आहे. हुकुमशाही प्रवृत्तीचा माणूस पंतप्रधानपदी नको म्हणत पवारांनी मोदींवर सडकून टीका करण्याची संधी सोडली नाही.