आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी बनली मुलगा तर मुलगा बनला मुलगी, आता दोघे मिळुन करणार हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुकन्या पहिली चंदू होती आणि आरव पहिला बिंदु होता. - Divya Marathi
सुकन्या पहिली चंदू होती आणि आरव पहिला बिंदु होता.
मुंबई- लिंगबदल करुन तो तरुण तरुणी तर तरुणी तरुण बनणार आहे त्यानंतर हे प्रेमी युगल लग्न करणार आहे. केरळचे असणारे आरव आणि सुकन्या हे 3 वर्षापुर्वी मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये भेटले होते. पहिल्या काही भेटीतच त्यांचे एकमेंकावर प्रेम बसले आणि आता ते सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहेत.
 
काय आहे पूर्ण प्रकरण
- केरळचा राहणारा आरव अप्पुकुट्टटन (वय 46) याचा जन्म एका मुलीच्या रुपात झाला होता. त्याच्या पालकांनी त्याचे नाव बिंदू असे ठेवले.
- टूर मॅनेजर असणाऱ्या आरवच्या आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये विविध शहरांमध्ये राहत होता.
- त्याला जाणवू लागले की आपले शरीर जरी महिलेचे असले तरी आपल्या भावना या पुरुषाच्या आहेत.
- त्यानंतर त्या दाढी-मिशाही आल्याने त्याने एका मुलाचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला. 
- आरव मुलांप्रमाणेच राहत होता. दुबईत असताना त्याला लिंगबदल शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळाली.
 
अशी झाली चंदूची सुकन्या
- आरवप्रमाणेच केरळमध्ये राहणाऱ्या सुकन्या कृष्णन (वय 22) चा जन्म एका पुरुषाच्या रुपात झाला. तिचे नाव चंदू असे ठेवण्यात आले.
- वाढत्या वयाबरोबर सुकन्याच्या लक्षात येऊ लागले की आपल्या भावना या महिलेप्रमाणे आहेत. वय वाढू लागल्यावर तिने महिलांचा पेहराव करणे सुरु केले. 
- तिला अनेक जण हिजडा म्हणून लागले. लोकांच्या तिरस्काराचा सामना करत ती सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली. ती बंगळुरु येथे एका मोठया सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे.
 
दोघेही करणार मंदिरात लग्न
- लवकरच हे दोघे शस्त्रक्रिया करुन लग्न करणार आहेत. 
- लग्नानंतर त्यांनी 1 मुल दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्या दोघांनी घेतलेल्या निर्णयास त्यांच्या कुटुंबियांचाही पाठिंबा आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा त्यांचे आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...