आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Mobile Phone, To Click Photos Of The Victim, Has Been Seized

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'तो\' मोबाईल पोलिसांच्या हाती, गँगरेपमधील एकही आरोपी अल्पवयीन नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वृत्तछायाचित्रकार महिलेवरील गँगरेप प्रकरणी महत्त्वाचा पुरावा ठरू शकणारा मोबाईल मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यातील डाटा तपासण्यासाठी मुंबई पोलिसांना केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि गुजरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक मदत करणार आहे. अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली आहे.
मुंबई गँगरेपः पीडितेसोबत सहका-याचीही हत्‍या करण्‍याचा होता आरोपींचा विचार

पोलिसांनी एका आरोपीला दिल्‍लीतून अटक केली होती. त्‍याने पैशांची चणचण भासल्‍यामुळे मोबाईल दिल्‍लीतच विकला होता. फोटो आणि व्हिडीओ त्‍यातच असल्‍यामुळे हा मोबाईल मिळविणे पोलिसांसमोरचे आव्हान होते. त्यातील फोटो आणि क्लिपचा गैरवापर होण्‍याची भीती असल्यामुळे आणि पीडितेची ओळखही सार्वजनिक होण्‍याचा धोका त्यातून होता. दुसरी महत्त्वाची बाब म्‍हणजे मोबाईल क्लिप याप्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्थितीत पोलिसांना तो मोबाईल आणि डाटा हस्‍तगत करणे आवश्‍यक होते, त्यात त्यांना यश आले आहे. विशेष म्‍हणजे, पीडित तरुणीने हे फोटो आणि व्हिडीओ नष्‍ट करण्‍याची पोलिसांना विनंती केली होती.


पुढील स्लाइडमध्ये, सत्यपाल सिंग म्हणाले एकही आरोपी अल्पवयीन नाही...