आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हा माझा भारत नाही’; गौरी लंकेश यांच्या हत्येने व्यथित झालेल्या ए. आर. रहमान यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान. - Divya Marathi
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान.
मुंबई- पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येने व्यथित झालेल्या प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘हा माझा भारत नाही’ असे वक्तव्य केले आहे. अभिनेता कमल हासन याने कठोर शब्दात आपले मत मांडल्यानंतर रहमान यांनी यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
 काय म्हणाले रहमान
रहमान यांनी याप्रकरणी निषेध नोंदविताना म्हटले की, ‘जर गौरी लंकेश यांच्यासारख्या वैचारिक व्यक्तींच्या हत्या होत असतील, तर हा माझा भारत नाही.’  ‘मां तुझे सलाम’ आणि ‘वंदेमातरम’ यांसारख्या गाण्यांना आपला आवाज देत भारतीयांमध्ये स्फुरण निर्माण करणाऱ्या रहमान यांनी हे वक्तव्य करून व्यवस्थेविरोधातील आपला रोष व्यक्त केला. रहमान यांनी गेल्या गुरुवारी मुंबई येथे त्यांच्या आगामी ‘वन हार्ट : द ए. आर. रहमान कॉन्सर्ट’ चित्रपटाच्या प्रीमियरप्रसंगी हे वक्तव्य केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...