आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 तासांत 969 विमानांचे मुंबई विमानतळावरून विक्रमी उड्डाण; प्रति 65 सेकंदास भरारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अत्यंत  कौशल्यपूर्ण व्यवस्थेचा परिचय देत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने रविवारी अनोखा जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केला. या विमानतळावरून केवळ २४ तासांमध्ये तब्बल ९६९ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग झाले. यापूर्वी २४ तासांत ९३५ विमानांचे परिचालन करण्याचा विक्रमही मुंबई विमानतळाच्या नावेच होता.

 

मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत. मात्र, दोन्ही धावपट्ट्यांची रचना बेरजेच्या चिन्हाप्रमाणे एकमेकांशी जोडलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी एकावेळी एकाच धावपट्टीचा वापर होतो. याउलट न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि दिल्लीसारख्या अत्यंत व्यग्र मानल्या जाणाऱ्या विमानतळावर दोन धावपट्ट्या सक्रिय आहेत. रोज सामान्यपणे सरासरी ९०० विमानांचे या धावपट्टीवरून उड्डाण आणि लँडिंग होत असते.   

 

गॅटविक प्रतितास ५० विमानांचे परिचालन करणारे विमानतळ

ब्रिटनमधील वेस्ट ससेक्स कौंटीतील गॅटविक विमानतळावरून एका तासात ५० पेक्षा जास्त विमानांची ये-जा होते. अशा प्रकारचे हे जगातील एकमेव विमानतळ आहे, तर जगभरातील उर्वरित सर्व विमानतळे साधारण ४२ पेक्षा कमीच विमानांचे परिचालन करत असते. परंतु मुंबई विमानतळ याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...