आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा व रेमंडचा अध्यक्ष नात्याने स्वतंत्र भूमिका; उद्योजक गौतम सिंघानिया यांचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वडील विजयपत सिंघानिया यांनी केलेल्या आरोपांवर रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले अाहे.  या वादासंबंधीचे वृत्त माध्यमांमध्ये  बुधवारी प्रसिद्ध झाले होते. त्यावर सिंघानिया म्हणाले, मुलगा आणि रेमंडचा अध्यक्ष या नात्याने माझ्या भूमिका व जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. हे प्रकरण जुने आहे.
 
ऑडिट समिती तसेच रेमंडच्या संचालकीय मंडळाने संपत्तीशी संबंधित प्रस्ताव समभागधारकांकडे मंजुरीसाठी पाठवले होते. औद्योगिक कार्यप्रणालीच्या नियमांनुसार असे करणे गरजेचे होते. पण समभागधारकांनी तो प्रस्ताव फेटाळला. पक्षकार या नात्याने यात मी मत दिले नाही. माझ्या मते, समभागधारकांचे हित कुटुंबांच्या हितापेक्षा मोठे असतात. त्यामुळे मी समभागधारकांच्या निर्णयाचे स्वागत केले. मुलगा या नात्याने मी दोन वर्षांपासून वडील आणि अन्य नातेवाइकांसोबतचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मुलाच्या रूपात मी माझ्या जबाबदारींप्रति वचनबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई उच्च न्यायालयाने रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी संपत्तीचा वाद सामंजस्याने सोडवण्यास सांगितले आहे. जे.के. हाऊसच्या एका घराचा ताबा दिला जात नसल्याचा विजयपत सिंघानिया यांचा आरोप आहे. पिता-पुत्रातील अशा प्रकारचा वाद न्यायालयापर्यंत येऊ नये, असे मत न्या. जी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...