आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेनच्या खाली आला युवक, पण पुढे जे काही घडले यावर विश्वासच नाही बसणार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅक क्रॉस करताना दरम्यान लोकल ट्रेनमध्ये खाली आलेला युवक.... - Divya Marathi
ट्रॅक क्रॉस करताना दरम्यान लोकल ट्रेनमध्ये खाली आलेला युवक....

मुंबई- रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना महिन्याला शेकडो लोकांचा बळी जात असला तरी लोक त्यापासून काहीही शिकत नाहीत हेच खरं. असेच एक ताजे प्रकरण मुंबईतील मशिद स्टेशनवर समोर आले. एक युवक रेल्वे ट्रॅक क्रॉस करून प्लॅटफार्मवर चढण्याच्या नादात लोकल ट्रेनखाली आला. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. याचाच प्रत्यय या युवकाला आला. ट्रेनने त्याला काही वेळ घासत नेलेही पण तरीही त्याचा जीव वाचला. युवक असा आला ट्रेनखाली.....

 

- मशिद स्टेशन जीआरपी द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजता 24 वर्षीय मोहम्मद मुस्तफा शेख मशिद स्टेशनवर एका लोकल ट्रेनमधून चुकीच्या बाजूने उतरला आणि रेल्वे ट्रॅक क्रॉस करून प्लॅटफॉर्मवर चढू लागला. 
- या दरम्यान, त्या एक लोकल ट्रेन ट्रॅकवर आली. मात्र, प्लॅटफॉर्मवर चढण्याआधीच तो ट्रेनखाली सापडला. ट्रेनने त्याला दूरपर्यंत घासत नेले. 
- मात्र, स्टेशन आल्याने मोटरमनने ट्रेनचे स्पीड कमी केले होते आणि ट्रॅक क्रॉस करताना शेख नावाच्या त्या युवकाला मोटरमनने पाहिले होते. त्यामुळे मोटरमनने इर्मजन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. मात्र, तरीही तो युवक घासत गेला. मात्र त्याचा जीव वाचला. नंतर त्याला लोकांनी बाहेर काढले.
- ट्रेनखाली येऊनही शेख याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या हाताला आणि शरीरावरील काही भागांना गंभीर जखमा झाल्या. सध्या त्याच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

 

युवकाने मागितली रेल्वेची माफी- 

 

- या युवकाचे नाव मोहम्मद मुस्तफा शेख असे आहे व तो एक टेम्पो ड्रायवर आहे. तो तिकिटाशिवाय सीएसटीवरून जाणा-या लोकल ट्रेनवरून प्रवास करत होता. या दरम्यान तिकिट चेकर आला आणि तो घाबरून ट्रेनमधून उडी मारून दुस-या प्लॅटफॉर्मवर चढताना रेल्वेखाली आला. 
- या घटनेनंतर शेखला आपली चुक लक्षात आली. तसेच त्याने जीआरपीकडे माफी मागितली. यानंतर तो म्हणाला, मी लोकांना आवाहन करतो की, काहीही झाले तरी रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका. यावेळी मी मृत्यूला चकवा दिला असला तरी प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही." 
- शेखची आई एक हार्ट पेशंट आहे. मुलाचा जीव वाचल्यानंतर ती म्हणाली की, मी अल्लाची आणि रेल्वेचे आभार मानते.
- माझ्या मुलाचा जीव वाचला तरी त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानेच पुढचे काम सोपे झाली. मी रेल्वेची खूप आभारी आहे." 
- ट्रेनखाली आल्यानंतर त्याला बाहेर काढून आरपीएफ कॉन्स्टेबल नितिन अवसरमाल आणि सब इंस्पेक्टर एसके यादव यांनी शेख यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये पोहचवले होते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या अपघाताचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...