आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवईतील झोपडपट्टीत गेले जीवन, ISRO त ज्वाईन होणारा ठरला पहिला मुंबईकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमेश हिरवेचे इस्त्रोमध्ये एक संशोधक-शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. - Divya Marathi
प्रथमेश हिरवेचे इस्त्रोमध्ये एक संशोधक-शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.

मुंबई- मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा एक तरूण इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनायजेशन (इस्रो)त शास्त्रज्ञ बनला आहे. इस्रोत एक संशोधक-शास्त्रज्ञ म्हणून रूजू झालेला हा मुंबईतील पहिला तरूण ठरला आहे. त्याच्या या यशामागे या तरूणाची 10 वर्षाची कठोर मेहनत आहे. झोपडपट्टीत राहते तरूणाचे कुटुंब...

 

- पवईतील झोपडपट्टीत राहणा-या 25 वर्षीय प्रथमेश हिरवेचा इस्रोपर्यंत जाण्याचा प्रवास फारच संघर्षपूर्ण राहिला. 
- मूळचा सातारा जिल्ह्यातील राहणा-या प्रथमेशचे पिता एका प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. आई फक्त 8 वीपर्यंत शिकलेली आहे. 
- त्यांचे संपूर्ण कुटुंब झोपडीपट्टीतील 10x10 च्या छोट्या खोलीत राहते. गरिबीत वाढलेल्या प्रथमेशने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
- त्याचे शेजारचे लोक सांगतात की, तो नेहमीच घरात अभ्यास करत असलेला दिसायचा. तो आणि त्याचा अभ्यास असे समीकरणच बनले होते.

 

सुरूवातीला इंग्रजी भाषा ठरत होती अडथळा- 

 

- प्रथमेशचे आई-वडिल त्याला एक इंजिनियर बनवू इच्छित होते. मात्र, खूप प्रयत्न करूनही त्याला इंजिनियरिंगला प्रवेश मिळू शकला नाही. 
- यानंतरही प्रथमेशने हिंमत हारली नाही आणि भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेजमधून इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचा डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. 
- प्रथमेशला आपल्या आयुष्यात अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. यात एक होती इंग्रजी भाषा. प्रथमेशने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले होते. डिप्लोमाची पहिली दोन वर्षे त्याला भाषेचा खूप त्रास सहन करावा लागला.
- इंग्रजी भाषा अडचणीची ठरू लागल्याचे लक्षात येताच त्याने बाजारातून डिक्शनरी आणली. त्याद्वारे त्याने प्रथम इंग्रजी सुधारण्यावर भर दिला. आज तो उत्तम इंग्रजी झाडतो.

 

असा पोहचला इस्त प्रथमेश-

 

- डिप्लोमा पूर्ण करताच प्रथमेशने इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून 2014 मध्ये इंजिनियरिंगची डिग्री घेतली.
- यानंतर त्याने यूनियन पब्लिक सर्विस कमीशन(UPSC) साठी प्रयत्न केला. मात्र, यशही मिळाले नाही आणि त्याने वेगळे काहीतरी करण्याचा विचार केला.
- यानंतर प्रथमेशने इस्रोत ट्राय केले. मात्र, सुरूवातीला यश आले नाही. नंतर तो एका कंपनीत इंजिनियर म्हणून रूजू झाला. मात्र, इस्रोसाठी प्रयत्नच करत राहिला.
- अखेर यंदा इस्रोच्या संशोधकासाठी झालेल्या परीक्षेतून 16 हजार विद्यार्थ्यांतून केवळ 9 तरूणांचे सिलेक्शन झाले. यात प्रथमेशचा समावेश होता.
- इस्रोमध्ये सिलेक्ट होण्यासाठी प्रथमेश मागील 10 वर्षापासून करत असलेल्या एकत्रित अभ्यासाचे फळ असल्याचे मानतो. सध्या तो चंडीगडमध्ये इस्त्रोच्या शाखेत पोस्टिंगवर आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, प्रथमेशचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...