आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंगेकरांविरोधात पुरावे नाहीत : सीबीआय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविरोधात पुरावे आढळले नाहीत, असे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (सीबीआय) सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सांगितले. न्यायमूर्ती एस. सी. दिघे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. निलंगेकरांना आदर्श प्रकरणात आरोपी करा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, निलंगेकरांविरोधात आदर्शमध्ये सहभाग असल्याचे सबळ पुरावे नसल्याचे सीबीआयने सांगितले. मार्च महिन्यांत आदर्श घोटाळाप्रकरणी 45 जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.