आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadarsh Scam Report Would Be Submitted On Thursday

‘आदर्श’चा अहवाल आज मुख्य सचिवांकडे देणार, अशोक चव्हाण यांना दिलासा मिळणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आदर्श सोसायटीचा अंतिम अहवाल गुरुवारी पूर्ण होणार आहे. याच दिवशी तो मुख्य सचिव जे. के. बांठिया यांच्याकडे हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. आयोगाने अंतरिम अहवालात आदर्श सोसायटीची जमीन राज्य सरकारची असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अंतिम अहवालात त्यावर शिक्कामोर्तब होऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना थोडा दिलासा मिळू शकेल, अशी आशा चव्हाण समर्थक काँग्रेस आमदार व कार्यकर्त्यांना आहे.
हा अहवाल गुरुवारी राज्य सरकारकडे देण्यात येणार असला तरी त्यापुढील कारवाई मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असेल.

अशोक चव्हाण यांची आरोपातून मुक्तता व्हावी, अशी काँग्रेसमधील एका गटाची इच्छा असून त्यांच्या समर्थक आमदारांचा एक गट त्यासाठी सरकारवर दबावाचाही प्रयत्न करत आहे. मात्र अशा वेळी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुख्यमंत्र्यांना अभ्यास करून निर्णय लांबवणीवर टाकण्याची सवय असल्याने हा अहवालही धूळ खात पडतो की त्यावर पुढे काही निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.