आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadarsh Society Issue, Ncp Blackmail Over On Tope, Tatkare Name In Report

तटकरे, टोपेंना गोवाल तर सरकार पाडू- राष्ट्रवादीची पृथ्वीबाबांना धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जलसंपदामंत्री सुनील तटकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांना नगरविकास राज्यमंत्री म्हणून कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नसताना, त्यांना या घोटाळ्यात गोवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात कारवाईची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी गप्प बसणार नाही. वेळ पडलीच तर सरकारमधून बाहेर पडू, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतली होती. राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यानंतर या नेत्यांना क्लीनचिट देत मंत्रिमंडळात आदर्श अहवाल अंशत स्वीकारण्याचे सारर्थ्य पार पडले.
मंत्रिमंडळाची बैठक काल सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक चांगलीच रंगली. या घोटाळ्यात सुनील तटकरे व राजेश टोपे यांना अकारण गोवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केला. काँग्रेस नेते अडकले असल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरही ठपका ठेवून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. काँग्रेसमधील लाथाळयांमुळे तटकरे, टोपी यांच्यावर आरोप होणार असेल तर ते सहन करू नयेत अशी भूमिका मंत्र्यांनी मांडले. दुसरीकडे काँग्रेसच्या प्री कॅबिनेटमध्ये सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत असे मंत्र्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील घडामोडीच्या बातम्या आणखी पुढे वाचा...