आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आदर्श सोसायटी घोटाळ्यात सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी आयोगासमोर दुस-या दिवशी साक्ष झाली. सोसायटीला बांधकाम करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याचे व सोसायटीच्या सदस्यांची कठोर पडताळणी करण्याचे निर्देश आपण दिले होते, असा दावा त्यांनी केला. सोसायटीचे प्रमोटर्स किंवा सभासदांसंदर्भात महसूल विभागाचे तत्कालीन मुख्य सचिव डॉ. डी. के. शंकरन यांनी कोणताही मुद्दा आपल्या निदर्शनास आणून दिला नाही, असेही ते म्हणाले.
सोसायटीला इरादापत्र देण्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिका-यांनी सादर केलेले अहवाल पाहिले नसल्याचे चव्हाण म्हणाले. शनिवारच्या साक्षीत हे अहवाल पुरेसे स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्या नोट्सचाच आधार घेऊन यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.
आदर्श प्रकरण : जमीन वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच - अशोकरावांचा पलटवार
आदर्श घोटाळा प्रकरणी आपण निर्दोषच : पाटील
आदर्श प्रकरण: सुशीलकुमारांनी दाखवले विलासरावांकडे बोट!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.