आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aadarsh Socity Scam Ashok Chavan Wife Amita Chavan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिता चव्हाणांकडून घेतले सहा लाख रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी आपण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी व आपल्या नणंद अमिता यांच्याकडून सहा लाख रुपये उसने घेतल्याची साक्ष सीमा शर्मा यांनी शुक्रवारी चौकशी आयोगासमोर दिली.
या गैरव्यवहारात आरोपी असलेले अशोक चव्हाण यांच्या सासू अन्य एका नातेवाईकांनी या सोसायटीत फ्लॅट घेतल्याचा आरोप आहे. सीमा यांनी निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांच्यासमोर शुक्रवारी सांगितले की, आदर्श सोसायटीमध्ये सदस्य होण्यासाठी आपण 2003 मध्ये अर्ज केला होता. 2008 मध्ये माझे सदस्यत्व मंजूर करण्यात आले. त्यानंतर आपण 73 लाख 33 हजार रुपये भरले होते. त्यासाठी माझे पती विनोद यांनी आई भगवती आणि बहिण अमिता यांच्याकडून प्रत्येकी सहा लाख रुपये कर्ज घेतले होते. विनोद हे अमिता यांचे बंधू आहेत.
तसेच ज्यावेळी आदर्शमध्ये फ्लॅट घेण्यात आला, त्यावेळी अशोक चव्हाण हे कोणते मंत्री होते हे आपल्याला आठवत नसल्याचे सीमा यांनी सांगितले. प्रत्यक्षात तेव्हा अशोक चव्हाण हे महसूल मंत्री होते. तसेच चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांची सासू भगवती शर्मा आणि सास-यांचे भाऊ मदनलाल यांना आदर्शमध्ये सदस्यत्व देण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणात अशोक चव्हाण यांचीही संबंधित आयोगासमोर दोनवेळा साक्ष झाली असून यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांकडे बोट दाखविले आहे.