आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विलासरावांची साक्ष 27 जूनला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी करणा-या जयपाल पाटील आयोगाने केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांना 27 व 28 जून रोजी साक्षीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 21 जून रोजी साक्ष देणे शक्य नसल्याने आपल्याला दुसरी तारीख द्यावी, अशा आशयाचा विनंती अर्ज देशमुख यांनी आयोगाला सादर केला होता.
21 जून रोजी नवी दिल्ली येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञानविषयक परिषदेला हजर राहणे गरजेचे असल्यामुळे आपल्याला त्या दिवशी आयोगासमोर साक्ष देणे अवघड असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच 22 जून रोजीदेखील हजर राहण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती, परंतु आयोगानेच त्यांना 27 व 28 जून रोजी हजर राहण्यास सांगितले. यापूर्वी आयोगाने देशमुख यांना 21 व 22 जून रोजी, तर सुशीलकुमार शिंदे यांना 25 व 26 जून रोजी हजर राहण्याचे आदेश बजावले होते. दरम्यान, 11 ते 25 जून या कालावधीत आदर्श सोसायटीतील 30 जणांची साक्ष आयोगासमोर नोंदवली जाणार आहे. त्यामध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केलेले आरोपी ब्रिगेडियर एम. एम. वांच्छू यांचाही समावेश आहे. त्यांची व ब्रिगेडियर आर. सी. शर्मा यांची साक्ष 20 जून रोजी होईल, तर विक्रम संगीतराव व देवयानी खोब्रागडे यांची साक्ष 26 जून रोजी होईल. विक्रम हा माजी परिवहन सचिव सी. एस. संगीतराव, तर देवयानी या बेस्ट सार्वजनिक उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत. त्या स्वत: भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत आहेत.
\'आदर्श\' घोटाळ्यातील सात आरोपींना जामीन मंजूर
आदर्श घोटाळा : भोगवटाबाबत ‘एमएमआरडीए’ला विचारणा
आदर्श प्रकरणः विलासराव, सुशीलकुमार यांना चौकशी आयोगाचा समन्‍स