आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’ची नोंदणी अंगणवाडी क्षेत्रात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आधार कार्ड क्रमांकाचा भविष्यातील उपयोग पाहता राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील माता, किशोरी व बालकांची माहिती विविध नोंद वह्यात भरताना त्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंद करण्याचा निर्णय शनिवारी राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये माता, किशोरी शक्ती योजना, सबला योजनेतील लाभार्थी व बालकांची म्हणजेच गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके व किशोर अशी नोंद विविध रजिस्टरमध्ये करताना प्रत्येक गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता, किशोरी व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हाच आधार कार्ड क्रमांक आरोग्य विभागात आरोग्य सेवा दिल्यानंतर बालकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण, जीवनसत्त्व-अ, जंतनाशक गोळ्या, औषधी इत्यादी जर बालकांना वयोगटाप्रमाणे दिल्या नसतील किंवा अपु-या दिल्या असतील तर त्या सर्व सेवा देण्यासाठी या आधार क्रमांकामुळे पाठपुरावा करता येणार आहे. बालक जर अतितीव्र कमी वजनाचे वा मध्यम तीव्र वजन गटातील असेल तर ग्राम बालविकास केंद्र किंवा बाल उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी विशेष सेवा देण्यासाठी तसेच नियोजन आणि संनियत्रण करण्यासाठीही आधारकार्ड क्रमांक महत्वाचा ठरणार आहे.
त्यामुळे अंगणवाडी केंद्रातील एकूण किती लाभार्थ्यांना आधार कार्ड क्रमांक मिळाला हे लक्षात येईल व उर्वरितांसाठी तशी व्यवस्था महसूल विभागामार्फत करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे महिला आणि बालविकास विभागाच्या एका अधिका-याने सांगितले.