आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadhar Card Compulsory To Government Employee For Salary

शासकीय कर्मचार्‍यांना वेतनासाठी आधार क्रमांकाची सक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आधार क्रमांक सादर केल्याशिवाय मुंबईसह सहा जिल्ह्यातील शासकीय कर्मचार्‍यांना वेतन मिळणार नसल्याचा आदेश वित्त विभागाने काढला आहे. त्यामुळे ‘आधार’ नसलेल्या कर्मचार्‍यांना मे महिन्याचे वेतन मिळण्यात अडचणी येत आहेत.

देशभरातील सर्व नागरिकांना एक ओळख क्रमांक असावा म्हणून केंद्र सरकारने आधार क्रमांकाची योजना आखली आहे. असे असले तरी आधार क्रमांकांसाठी नोंद करणे सक्तीचे नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही राज्य सरकारच्या सर्व योजनासांठी आधार क्रमांक सक्तीचा केलेला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता सरकार कर्मचार्‍यांना वेतनासाठीही आधारची सक्ती वित्त विभागाने केली आहे. अमरावती, वर्धा, पुणे, नंदूरबार, मुंबई शहर व मुंबई उपनगर या सहांसाठी तूर्त ही सक्ती करण्यात आली आहे. ज्या कर्मचार्‍यांनी आधार क्रमांक नोंदवला नसेल त्यांना मे महिन्याचे वेतन दिले जाणार नसल्याचेही आदेशात म्हटले आहे. मात्र ‘आधार’ मिळवण्यात अडचणी येत असल्याने पुन्हा एक महिन्याची मुदतही वाढवून दिली आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्याच्या वेतनासाठी शासकीय कर्मचार्‍यांनी आधार क्रमांकासाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.