आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल चौकात तिरंगा फडकावणाऱ्या शिवसैनिकांच्या अटकेवरून आदित्य ठाकरेंचे भाजपला चिमटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुजरात निवडणुकांच्या तोंडांवर काँग्रेससारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी काट्याची टक्कर सुरू असतानाच भाजपला शिवसेनेसारख्या मित्रपक्षाच्या विरोधाचाही सामना करावा लागत आहे. शिवसेना भाजपवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावल्याच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनीही भाजपला चिमटा काढला आहे. राष्ट्रभक्तीचे धडे शिकवणाऱ्यांच्या राज्यात तिरंगा फडकावणाऱ्यांना अटक होते, हे वाईट असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 


काय म्हणाले आदित्य ठाकरे.. 
आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी ट्वीट करून या संपूर्ण प्रकरणावर भूमिका मांडली. या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरेंनी पोस्ट केले, 'आमच्या देशात, तिरंगा फडकवण्याचं चॅलेंज मिळणं ही वाईट वाटण्याची गोष्ट आहे. ह्याच्याहून वाईट वाटलं की त्या शूर शिवसैनिकांना, सर्व प्रथम हिंदुस्थानीयांना, “detain” केलं गेलं - ते ही अश्या राज्यात जिथे उप मुख्यमंत्री अश्या पक्षाचे आहेत जे लोकांना राष्ट्रीयत्व शिकवत असतात खरं तर त्या हिंदुस्थानीयांना, पक्ष भेद विसरून सरकार ने पाठिंबा देणे गरजेचे होते. त्या आपल्या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे.

 

27 नोव्‍हेंबर रेाजी 'पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची भाषा करणा-या मोदी सरकारने आधी श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय ध्वज फडकवून दाखवावा', अस विधान फारुख अब्‍दुल्‍ला यांनी केल होतं. ते विधान स्वीकारत शिवसैनिकांनी तिरंगा फडकावला होता. 

 

पुढे पाहा आदित्य ठाकरेंनी केलेले ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...