आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आजीबाईची शाळा’: गुलाबी नऊवारी नेसून सासू-सूना सोबतच येतात शाळेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रातील ठाण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर फनगाणे येथील एका स्कूलची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. आजीबाईच्या शाळेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, शाळेत मागील एक वर्षापासून  28 महिला शिकायला येतात. 60 ते 90 वयोगटातील या महिला आहेत. 

गुलाबी नऊवारी नेसून शाळेत येतात महिला... 
- गुलाबी नऊवारी नेसून सर्व महिला शाळेत येतात. 
- सगळ्याच्या पाठीवर स्कूल बॅग असते. 
- दरम्यान, संपूर्ण गावाला साक्षर बनवण्यासाठी गेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘आजीबाईची शाळा’ सुरु झाली.  
- शिक्षक योगेन्द्र बांगर यांनी ही शाळा सुरु केली आहे.

सासू-सून सोबतच येतात शाळेत.... 
- 'आजीबाईच्या शाळेत 60 वर्षीय कांताबाई मोरे या शिकायला येतात. 
- त्यांना शिकवणारी शिक्षिका शीतल ही त्यांची सून आहे. 
- 87 वर्षीय रमाबाई यांना ऐकू येत नाही. मात्र, साक्षर व्हायची त्यांची इच्छाच नव्हे तर जिद्द आहे. - शाळेच्या भिंतींना मराठी अल्फाबेट लिहिलेल्या टाइल्स आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गुलाबी नऊवारी नेसून शाळेत येणार्‍या सासू-सूनांचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...