आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aaliya Bhatt Speaking On 'Highway' S Shooting Place

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्या निर्णयात डॅडींचा सहभाग नसतोच - आलिया भट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माझ्या व्यावसायिक आयुष्यात पापा महेश भट यांचा कधीही सहभाग नसतो, असे मत आलिया भट हिने व्यक्त केले आहे. ‘हायवे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ती बोलत होती.
आलिया म्हणाली, मी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यामुळे सर्वात आधी मी त्याचा सल्ला घेते. धर्मा प्रॉडक्शनसोबत तीन चित्रपटांचा करार केला आहे. त्यामुळे सध्या तरी कोणताही चित्रपट स्वीकारताना त्याचे मत आधी विचारात घेते. पापांनी चित्रपट करण्यास केवळ परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपट निवडण्याबाबत मी स्वत: निर्णय घेते. मात्र, मी ज्या चित्रपटात काम करते, त्याबाबत त्यांना माहिती असते. तसेच देशात व परदेशात चित्रीकरणासाठी जाताना त्यांची परवानगी घ्यावीच लागते, असेही ती म्हणाली. पापा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांची विशेष फिल्म ही कंपनीदेखील आहे. मात्र, त्यांच्यासोबत मी अजून एकही चित्रपट केला नाही. करण जोहरने मला ब्रेक दिला आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगळाच होता. काही दिवसांनंतर धर्मा प्रॉडक्शनच्या आणखी दोन चित्रपटांना सुरुवात करणार आहे. सध्या इम्तियाज अलीच्या ‘हायवे’चे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात रणदीप हुडासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता, असेही ती म्हणाली.
‘हायवे’ मेकअपविना
आलिया सध्या इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तिने मेकअपविना काम केले आहे. मेकअपविना काम करताना काहीही अडचण आली नसल्याचे सांगत हा चित्रपट हिट होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. यापूर्वीही सोनम कपूर हिने अनेक चित्रपटांत विना मेकअप काम केले आहे. त्यामुळे तिची तुलना सोनमशी करण्यात येत आहे.