आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Not Be Ambassador For Maha Govt\'s Flagship Scheme; Fadnavis Confirms

\'जलयुक्त शिवार\'चा ब्रॅंड अॅम्बेसिडर आमिर नाही- फडणवीसांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमिर खान... - Divya Marathi
एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमिर खान...
मुंबई- देशात असहिष्णुता वाढत असल्याचे वक्तव्य करून वादात अडकलेला आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'अतुल्य भारत' अभियानातील 'अतिथी देवो भव' या मोहिमेतून आमिरची गच्छंती झाल्यानंतर आता तो महाराष्ट्र सरकारचा ब्रॅंड अॅम्बेसिडर बनणार असल्याच्या बातम्या माध्यमांत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. आमिर खानला जलयुक्त शिवार योजनेचा सदिच्छादूत करण्याचा सरकारचा तूर्तास तरी कोणताही विचार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात सध्या अभिनव व चर्चेत असलेली जलयुक्त शिवार ही योजना लोकप्रिय झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या योजनेचे महाराष्ट्रासह देशभरात कौतूक होत आहे. शेती व जलतज्ज्ञांनीही जलयुक्त शिवारचे तोंडभरून कौतूक केले आहे. या योजनेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ही योजना शेतक-यांत एक चळवळ बनावी यासाठी यासाठी फडणवीस यांचा प्रयत्न आहे. यासाठीच या योजनेची शेतक-यांत उत्तमरित्या जनजागृती करण्यासाठी एका चांगल्या चेह-याची गरज आहे. आमिर खानसारख्या लोकप्रिय सेलिब्रेटीजचा या योजनेसाठी वापर केल्यास फायदा होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
याबाबत सांगितले जात आहे की, स्वत: आमिर खानने मुख्यमंत्र्यांना भेटून जलयुक्त शिवार योजनेची शेतक-यांत जनजागृती करण्याची आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. आमिर खानने जलयुक्त शिवार योजनेसाठी काही महिन्यापूर्वीच 11 लाख रूपये दिले होते. मात्र, असहिष्णेतेबाबत वक्तव्य केल्यानंतर आमिर खानवर प्रचंड टीका झाली. तसेच गेल्या महिन्यात 'इनक्रेडेबल इंडिया' या मोहिमेतून आमिरची गच्छंती झाली आहे.
'सत्यमेव जयते'द्वारे आमिरने मांडले देशातील ज्वलंत प्रश्न-
- आमिर खान याची चोखंदळ व सामाजिक दृष्टीकोन असलेला अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.
- आमिरने दोन-तीन वर्षापूर्वी देशातील विविध ज्वलंत समस्येला हात घालत सत्यमेव जयते मालिका काढत समाजातील विविध पैलू समाजासमोर मांडण्याचे काम केले होते. या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
- मंगल पाडे, लगान, सरफरोश, रंग दे बसंती अशा अनेक राष्ट्रभक्तीवर आधारित चित्रपटात आमिरने काम केले आहे.
- वर्षभरात एक-दुसरा तो सिनेमा करतो. पैशासाठी ऊठसूठ तो सिनेमे स्वीकारत नाही. त्याला स्क्रिफ्ट आवडली तरच तो त्यात काम करतो.
- आमिर खान पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात राहतो.
मोदी-फडणवीसांसमवेत आमिरचे डीनर-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी मुंबईत आले असता त्यांनी आमिर खानसोबत डिनर घेतले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती.
- रविवारी रात्री चौपाटीवरील महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात आग लागली त्यावेळी आमिर खान तेथेच फडणवीस यांच्यासमवेत होता.
- मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण आग विझेपर्यंत थांबवून व्यवस्थापन पाहिले होते. यावेळी आमिर तेथेच होता व त्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे टि्वटरवरून तोंडभरून कौतूक केले होते.
- त्यामुळेच आमिर खानचे पंतप्रधान मोदींसह फडणवीस यांच्याशी उत्तम संवाद असल्याचे सांगितले जाते.
- अतुल्य भारत योजनेत नियमानुसार करार संपल्याने त्याला हटविल्याचे केंद्रातील संबंधित मंत्रालयाने म्हटले होते. असे असले तरी असहिष्णूतेबाबत दिलेल्या वक्तव्यानंतर भाजपमधील अनेक मंडळी दुखावली होती. आमिर खानवर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती.
पुढे वाचा, विविध सामाजिक प्रश्नांबाबत आमिर खान सजग...