आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यमेव जयते 2 : बलात्काराच्या घटना आणि व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेवर आमिरचे बोट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या अभिनेता आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचा दुसरा सीझन आजपासून सुरू झाला. पहिल्याच भागात आमिर खानने गँगरेप आणि व्यवस्थेच्या असंवेदनशीलपणावर भाष्य केले. पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शोच्या सुरुवातीलाच आमिरने आजचा भाग हा संवेदनशील असल्याचे सांगत 12 वर्षाखालील मुलांना हा शो दाखवू नका, असे आवाहन केले होते. लहान मुलांवर अशा घटनांचा वाईट परिणाम होतो असे आमिरचे म्हणणे आहे.
आजच्या पहिल्या भागात दिल्ली गँगरेप आणि त्यानंतर देशभरात उठलेल्या वादळाचे वर्णन करण्यात आले होते. 21 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत गँगरेप झाला होता. मात्र त्यानंतरच्या एक-दीड वर्षात अद्याप व्यवस्थेत म्हणजे पोलिस, डॉक्टर यांच्यातील संवेदनशीलता अद्याप जागरूकता झाली नसल्याचे आमिरने या कार्यक्रमातून दाखवून दिले. पोलिसांशिवाय बलात्कार पीडितांना वैद्यकीय व्यवस्थेकडूनही दुटप्पी वागणूक मिळत असल्याचे आमिरने दाखवून दिले.
आमिरने या कार्यक्रमात गँगरेपच्या एक हृदयद्रावक घटनेवरही प्रकाश टाकला. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मात्र याबाबत तक्रार दाखल करायला गेलेल्या पालकांनाच पोलिसांनी रात्रभर ताटकळत कसे ठेवले होते याची छलक देशाला दाखविली. पोलिसांनी दखल न घेतल्याने मुलीचे नातेवाईक रिकाम्या हाताने घरी परतले. मात्र यानंतरही त्या मुलीवर त्याच नराधमांनी दुसऱ्यांदा बलात्कार केला. यानंतर या गुंडांनी मुलीला आणि तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. पण पाषाण हृदयी पोलिसांना याची दखल घ्यावी वाटली नाही. दुस-यांदा बलात्कार केल्यानंतर 8-10 दिवसांनी पोलिसांनी काही जणांना अटक केली. मात्र तोपर्यंत त्या अल्पवयीन मुलीने हे जग सोडले होते.
वर्ष 2012 मध्ये भारतात बलात्काराच्या 1 लाख 1 हजार 41 घटना घडल्याचे आमिरने निदर्शनास आणून दिले. त्यापैकी फक्त 3563 आरोपींना शिक्षा झाली. तर 86, 032 केसेस पेंडिंग असल्याचे आमिरने कार्यक्रमात सांगितले.
पुढे वाचा, सोशल नेटवर्किंग साईटवर आमिरच्या आजच्या कार्यक्रमाबाबत आलेल्या प्रतिक्रिया....