आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • #AamirKhan Shivsena Hallaboll On Aamir Khan, Ncp Pawar No Comment

#AamirKhan: सापाला दूध पाजले- रामदास कदम; पवारांचे No Comment

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आजपर्यंत आम्ही सापाला दूध पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अमिर खानच्या वक्तव्यावर दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अमिर खानच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार देत त्यापेक्षा संतोष महाडिकांचा विषय महत्त्वाचा आहे असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. देशात आता गोध्रासारखी स्थिती नाही. अमिर खानने देश सोडण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो की काय घडतंय आजूबाजूला. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. त्याचा इन्कार करू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे अमिर खानने रविवारी एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले. यावरून पुन्हा एकदा भारतातील असहिष्णू वातावरणाबाबत चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, अमिर खान अनेक नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. काही बॉलिवूड मंडळींनी अमिरला नसीहत दिली आहे तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. काही राजकीय पक्षांनीही अमिर खानचे वक्तव्य अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
आमीर खानच्या वक्तव्यापेक्षा देशासाठी कर्नल संतोष महाडिकांचा विषय जास्त महत्त्वाचा असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. शहीद संतोष महाडिकांच्या साता-यातील पोगरवाडी या जन्मगावी जाऊन पवारांनी महाडिक कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांनी पवारांनी आमीरच्या देश सोडण्याच्या वक्तव्यावर छेडले असता त्यांनी वरील भाष्य केले.
शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अमिर खानवर हल्लाबोल केला आहे. आम्ही आजपर्यंत सापाला दूध पाजले. तो साप देशाला डसत आहे असे कदम यांनी प्रतिक्रिया दिली. मागील पंधरवड्यात शाहरूख खानने जेव्हा असहिष्णेतेवर भाष्य केले होते. तेव्हा शिवसेनेने शाहरूख खानची बाजू घेतली होती. एक मुसलमान म्हणून शाहरूखला लक्ष्य करणे चुकीचे आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून त्याला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे असे म्हणत शिवसेनेने शाहरूखची बाजू घेतली होती. मात्र, आता अमिर खानला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
सामान्य नागरिकांची अमिर खानवर टीका
दरम्यान, अमिर खान याच्या वक्तव्यानंतर राज्यातील प्रमुख शहरांतील नागरिकांनी अमिर खानवर टीका केली. अमिर खान व त्याची पत्नी किरण राव त्याला काय म्हणाली हा त्यांचा कौटुंबिक व व्यक्तिगत प्रश्न आहे. तो सार्वजनिक ठिकाणी चर्चेचा विषय नाही. भारत देश सहिष्णू आहे, येथील लोक सहिष्णू आहेत हे कोणीही सांगण्याची गरज नाही. तरूण-तरूणींनीही अमिर खानला फटकारले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरातील तरूणांनी अमिर खानचे वक्तव्य अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे.