आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap And Adv. Prakash Ambedkar News In Marathi, Akola

अकोल्यात ‘आप’चा अॅड. प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी दिलेला आघाडीचा प्रस्ताव ‘आप’ने फेटाळला आहे. मात्र, अँड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघात जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाच्या राज्य समितीने घेतला असल्याची माहिती ‘आप’च्या सूत्रांनी सोमवारी दिली.

चार दिवसांपूर्वी मुंबईत भारिप-बहुजन महासंघप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या (एमडीएफ) घटक पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये लोकसभा निवडणुकांसाठी ‘आप’शी आघाडी करण्याचा निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव ‘आप’कडे देण्यातही आला होता. अँड. आंबेडकर यांचे राजकारण आजपर्यंत निधर्मीच राहिले आहे. मात्र, देशात कोणाशीही निवडणूकपूर्व आघाडी करायची नाही, असा केंद्रीय कमिटीचा निर्णय आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा आघाडीचा प्रस्ताव स्वीकारणे अशक्य होते, असे ‘आप’च्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

‘अँड. आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी आम्हाला आदर आहे. त्यांनी अकोल्यात उभे राहावे. आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही’, असा निर्णय ‘आप’च्या राज्य समितीने घेतला आहे.