आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या क्लबने लाटले खेळाचे मैदान, आम आदमी पक्षाचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शरद पवार अध्यक्ष असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने क्रीडांगणासाठी राखीव ठेवलेला कांदिवली येथील महापालिकेचा 67 एकरांचा भूखंड लाटला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच याबाबतची कागदपत्रेही पत्रकारांना सादर केली.

2003 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे शरद पवार अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी मुंबई महापालिकेस या भूखंडाबाबत पत्र लिहिले होते. पवारांच्या पत्रानंतर केवळ पाच दिवसांत पालिकेने हा भूखंड क्लबला केवळ एक रुपया नाममात्र दरात दिला होता. विकास करण्याच्या अटीवर पालिकेच्या वतीने असे भूखंड देण्यात येतात. त्या धोरणाच्या आधारेच एमसीए क्लबला 2003 मध्ये भूखंड देण्यात आला होता, परंतु क्लबने या ठिकाणी उद्यान विकसित करण्याऐवजी खेळपट्टी, टेनिस कोर्ट, रेस्टाँरंट उभारले. हा भूखंड उद्यान विकसित करण्यासाठी दिला होता. मात्र, क्लब उभारून केवळ र्शीमंतासाठी प्रवेश ठेवला. सामान्यांना प्रवेश नसलेल्या या क्लबच्या उद्घाटनाला स्थगिती द्यावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशाराही दमानिया यांनी दिला.