आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भगौडा’ कलंक पुसण्यासाठी केजरींचा संदेश ‘जनलोकपाल’साठी दिल्लीचा सत्तात्याग'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अरविंद केजरीवाल हे पळपुटे (भगौडा) आहेत, या काँग्रेस-भाजपच्या सततच्या टीकेमुळे ‘आप’चा आलेख घसरत आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत गुप्त संदेश आणि केजरीवाल यांचा मराठीसह सर्व प्रमुख प्रादेशिक भाषेतील व्हिडिओ संदेश पोहोचवण्याची रणनीती पक्षाने आखली आहे.
हा व्हिडिओ संदेश दोन मिनिटांचा असून त्यात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यामागील कारणे समजावून सांगण्यात आली आहेत. जनलोकपाल विधेयकासाठीच दिल्लीतील सत्तात्याग केल्याचे मतदारांना सांगण्याचे संदेश प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवले आहेत.
दिल्लीतील केजरीवाल सरकार 49 दिवस चालले. जनलोकपालच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला. सत्तात्याग केल्यास त्याचा फटका भाजप व काँग्रेसला बसेल. त्यानंतर होणार्‍या निवडणुकीत ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आपला आशा होती. लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने देशात 350 पेक्षा अधिक उमेदवार उभे केले आहेत. या प्रचारात काँग्रेस आणि भाजप दोघेही ‘आप’वर जोरदार टीका करत आहेत. केजरीवाल पळपुटे आहेत, असा सातत्याने आरोप होत आहे.
विरोधकांकडून केजरीवाल यांना ‘भगौडा’ संबोधले जात असून या आरोपास काय उत्तर द्यायचे याविषयी एक मसुदा ‘आप’ने बनवला आहे. त्या मसुद्याचे पत्र देशातील वरिष्ठ कार्यकर्त्यांना ‘आप’ने दोन दिवसांपूर्वी पाठवले आहे. त्यामध्ये दिल्ली सरकारने राजीनामा देण्यामागची तर्कशुद्ध कारणे दिली आहेत.
असा आहे संदेश
‘आप’चे दिल्लीतील सरकार अल्पमतातले होते. काँग्रेसने 18 मुद्द्यांवर या सरकारला विनाशर्त पाठिंबा दिला होता. जनलोकपाल आणण्याचे आम्ही दिल्लीकरांना वचन दिले होते. त्याची पूर्ती करण्यासाठी विधेयक मांडले, परंतु काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी केली. त्यामुळे आपने सतात्याग केला. जनलोकपालाबाबत आप कायम कटिबद्ध राहील.