आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Blames Power Companies, Ministry For High Tariff In Maharashtra

अजित पवार यांच्या खात्यात 22 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची ‘ऊर्जा’, दमानियांनी भरला दम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गरज नसताना कोळशाची आयात, वीज प्रकल्पांची घटलेली कार्यक्षमता आणि वारेमाप भांडवली गुंतवणूक यामुळे अजित पवार यांच्या अखत्यारीतील राज्याच्या ऊर्जा विभागात तब्बल 22 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
केंद्राने 2013 मध्ये राज्याला 41 दशलक्ष टन कोळसा उपलब्ध करुन दिला असताना महाजनकोने त्यापैकी केवळ 30 दशलक्ष टनच उचल केली. उर्वरित कोळसा खुल्या बाजारातून घेतला. त्यात राज्य शासनाला 5 हजार 700 कोटीचा फटका बसल्याचे दमानिया यांचे म्हणणे आहे. महाजनकोच्या औष्णिक प्रकल्पामध्ये निकृष्ट पद्धतीच्या कोळशाचा वापर होतो. त्यामुळे एनटीपीसीच्या तुलनेत या प्रकल्पांची वीजनिर्मिती 15 टक्क्यांनी कमी आहे. परिणामी, मागील तीन वर्षांत 2 हजार 926 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणतात दमानिया?