आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Fields Phiroze Palkhivala Against Priya Dutt In Mumbai

प्रिया दत्तविरोधात फिरोज पालखीवाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्याविरोधात आम आदमी पक्षाने प्रख्यात कायदेपंडीत फिरोज पालखीवाला यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आम आदमी पक्षाने शनिवारी लोकसभा उमेदवारांची 10 यादी प्रसिद्ध केली, त्यात 22 नावे आहेत. बिहार 8, राजस्थान 7, महाराष्ट्र, केरळ, गुजरात प्रत्येकी 2 आणि झारखंडमधील एका उमेदवारांचा समावेश आहे.

उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार काँग्रेसच्या प्रिया दत्त आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात यावेळी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी दिली आहे. तर ‘आप’ने प्रख्यात कायदेपंडीत फिरोझ पालखीवाला यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथील लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात 10 उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतील सहाही मतदारसंघांपैकी त्यांनी केवळ शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याची शक्यता नाही. त्यामुळे आजवर येथे कॉँग्रेस व भाजप यांच्यातच दुरंगी सामना होणार होता. पालखीवाला यांच्या उमेदवारीने तोे तिरंगी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. पालखीवाला पारशी समाजाचे आहेत. मागच्या दोन्ही वेळेस प्रिया दत्त यांनी विजय मिळवलेला आहे.

‘दक्षिण’मध्ये सुंदर
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून सुंदर बालकृष्णन यांना आम आदमी पक्षाने तिकीट दिले आहे. येथे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विद्यामान खासदार आहेत. तर शिवसेनेने राहुल शेवाळे यांना दादरच्या बालेकिल्ल्यात उमेदवारी दिली आहे.

संधी गमावणार नाही : पालखीवाला
फिरोज पालखीवाला मुंबई उच्च् न्यायालयात प्रॅक्टीस करतात. प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि कायदेपंडित नानी पालखीवाला यांचे ते चिरंजीव आहेत. जानेवारी महिन्यात त्यांनी आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘आजपर्यंत मी सर्व राजकीय पक्षांपासून दूर राहिलो. कारण, मला कोणताच पक्ष योग्य वाटत नव्हता. ‘आप’च्या रुपाने सशक्त पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे ही संधी आपण गमावता कामा नये’, अशी प्रतिक्रिया फिरोज पालखीवाला यांनी ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केली.