आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Mumbai 200 Party Workers Resign Due To Mayank Gandhi

'आप'ला महाराष्ट्रात झटका, मुंबईतील 200 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुंबईत मराठी पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुमारे 200 कार्यकर्त्यांनी आपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केेली)
मुंबई- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला चांगलाच झटका बसला आहे. मुंबईतील आपचे नेते मयांक गांधी यांच्या कार्यपद्धतीवर दोष ठेवत पक्षातील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी आज सामूहिक राजीनामे दिले आहेत. आज मुंबईत मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ते जगभर चर्चेला आले होते. मात्र, त्यानंतर केवळ 49 दिवसात राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल यांचे दिवस इतके फिरले की आजकाल ते कुठे आहेत असे विचारावे लागते. मागील महिन्या-दोन महिन्याच्या काळात केजरीवाल अजिबात माध्यमांसमोर आले नाहीत. दरम्यान, महाराष्ट्रातील आम आदमी पक्षात यापूर्वीच फूट पडली होती. पक्षाच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी काही नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाला वैतागून राजीनामा देणे पसंत केले होते. त्यानंतर केजरीवाल व दिल्लीतील नेत्यांची त्यांची समजूत घातली होती.
आता मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र, पक्षाने महाराष्ट्रासह हरिणायातील विधानसभा निवडणुका न लढता केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते नाराज होते. आता आपचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत सुमारे 200 कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे.