आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला- मुलींना लाभले पालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्या िदवसेंिदवस वाढत अाहेत. घरातील कमावत माणूसच िनघून गेल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंंबातील मुला-मुलींच्या िशक्षणाचा मोठा प्रश्न िनर्माण झाला आहे. मराठवाडा -िवदर्भातील अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील १०४ बालकांना आम आदमी पक्षाने पालक िमळवून िदले अाहेत. या विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंतच्या िशक्षणाचा खर्च हे पालक उचलणार अाहेत.

आम आदमी पक्षाने १७ ते २४ मेदरम्यान मराठवाडा आणि िवदर्भात ‘शेतकरी संवाद यात्रा’ काढली होती. या यात्रेत पक्षाचे ३०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. संवाद यात्रेने मराठवाड्यातील २६, तर िवदर्भातील १०१ गावांना भेटी दिल्या. आठ िदवस फिरून शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातील ३८, तर िवदर्भातील ११५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची घरी जाऊन भेट घेतली. तसेच राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या या कळीच्या प्रश्नावर आपल्यापरीने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून एक कल्पना पुढे आली, ती म्हणजे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींच्या िशक्षणासाठी मदत करण्याची.

वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुला-मुलींना िकती मदत द्यायची, कशी द्यायची? त्याबाबत तत्काळ धोरण ठरवण्यात आले. पक्षाचे कोशाध्यक्ष संजय परमार यांच्यावर देणगीदार शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली. यात्रेचा समारोप सहा िदवसांनी िसंदखेडराजा (िज. बुलडाणा) येथे होणार होता. यात्रेच्या समारोपाला एक िदवस बाकी असतानाच परमार यांच्याकडे १०५ देणगीदारांची नावे तयार होती. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील ज्या १०४ मुला-मुलींना पक्षातर्फे मदत करण्यात येणार अाहे. त्यांच्या मदतवाटपाची सुरुवात मुंबई मराठी पत्रकार संघात जून रोजी झाली. या वेळी तीन िवद्यार्थ्यांना प्रत्येकी बारा हजारांचे धनादेश देण्यात आले.
लक्ष्मी सुराडकर, विकास सुराडकर (जि. अमरावती) आणि माणिक काैंसाले (जि. नांदेड) या बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणारे मुंबईचे कॅ. अंजन सिन्हा आणि ठाण्याच्या रझिया काझी.

मी देणगीदार
१. कवठाकोडा (चांदूर रेल्वे, िज. अमरावती) गावच्यािवकास प्रवीण सुराडकर (इयत्ता ६) याच्या िशक्षणाची जबाबदारी कल्याणच्या आॅनलाइन व्यावसायिक रझिया काझी यांनी घेतली आहे. समाजाचे मीसुद्धा काही देणे लागतो याच भावनेतून देणगीचा िनर्णय घेतल्याचे रझिया यांनी ‘िदव्य मराठी’ला सांगितले.
२.िचंचाेळे (कंधार, िज. नांदेड) -गावच्या माणिक िकसन काैंसाले (इयत्ता ९) याच्या िशक्षणाची जबाबदारी मुलुंडमधील प्रसिद्ध जहाजबांधणी उद्योजक कॅ. अंजन सिन्हा यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे शहरी जनतेचे कर्तव्य असल्याचे सिन्हा यांचे म्हणणे आहे.

वर्षाला १२ हजार
मदतीसाठीनिवडलेल्या प्रत्येक िवद्यार्थ्यांच्या आईच्या बँक खात्यात वर्षाला १२ हजारांचा धनादेश जमा करण्यात येईल. सदर िवद्यार्थी बारावीचे िशक्षण पूर्ण करेपर्यंत त्याला बारा हजार इतकी मदत िदली जाणार आहे.

खंड पडणार नाही
देणगीदारवर्षाला धनादेश जमा करतील याची पक्ष दक्षता घेईल. एखाद्या देणगीदाराने मध्येच देणगी थांबवल्यास पक्ष पर्यायी देणगीदार उभा करेल अशी ग्वाही ‘आप’चे राज्य संयोजक सुभाष वारे यांनी िदली.