आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’च्या बंडखाेरांचा नवा पक्ष महिनाभरात, दाेन आॅक्टोबर रोजी दिल्लीत हाेणार घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आप’मधून बाहेर पडलेल्या राजकीय िवश्लेषक योगेंद्र यादव गटाच्या नव्या पक्षाची िदल्लीत २ आॅक्टोबर रोजी घोषणा होत अाहे. ‘आप’सारखा प्रयोग असलेल्या या नव्या पक्षात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा वाटा सर्वाधिक असून त्यामध्ये नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचेही नाव अग्रभागी अाहे.

अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर योगेंद्र यादव यांची आपमधून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर यादव यांनी शेतकरी प्रश्नांवर स्वराज अभियान देशभर राबवले. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी िदल्लीत त्यांनी नव्या पक्ष स्थापनेची घोषणाही केली होती. स्वराज अभियानाच्या मार्फत देशभर सध्या िवविध प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या संघटनांची मते आजमावली जात आहेत. मुंबईत ८ सप्टेंबर रोजी अशी बैठक पार पडली. ‘आप’च्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा असलेले जेएनयूमधील प्रा. अजित झा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील अनेक संघटनांचे नेते या बैठकीस हजर होते. नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या राष्ट्रीय जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे प्रतिनिधीही बैठकीस होते. ‘आप’ पक्षाचे प्रणेते अण्णा हजारे महाराष्ट्रातले असले तरी या पक्षाचे राज्यातील स्थान नगण्य हाेते. लोकसभेच्या िनवडणुकांत राज्यात सपशेल अपयश आल्यामुळे आपने िवधानसभा िनवडणुकांपासून चार हात लांब राहणे पसंत केले होते. त्यामुळे ‘आप’चे उरलेसुरले कार्यकर्ते इतर पक्ष-संघटनांत गेले. बाकी राहिलेले समाजवादी कार्यकर्ते स्वराज अभियानात गेल्याने राज्यात ‘आप’चे माेजकेच लाेक शिल्लक अाहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, समविचारी संघटनांना निमंत्रण
बातम्या आणखी आहेत...