आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली तो झांकी है...! आपच्या विजयानंतर मुंबईत जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: आम आदमी पक्षाच्या विजयानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत, गिटार वाजवत जल्लोष साजरा केला. अंजली दमानियाही त्यात मागे नव्हत्या.
मुंबई - आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे मंगळवारी मुंबईत दणकेबाज सेलिब्रेशन झाले. दादरमधील पद्मशाली सभागृह भाड्याने घेऊन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ढोलताशांच्या गजरात बेधुंद नृत्य केले. मिठाई, गांधी टोप्यांचे वाटपही उत्साहात करण्यात आले. हॉलमधील स्क्रीनवर ‘आप’ची संख्या जशीजशी वाढत होती तसतसे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. ‘दिल्ली तो झांकी है, पुरा देश बाकी है’ अशी घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

शाजिया इल्मींच्या बधाईच्या ट्विटवर सर्वात जास्त चित्कार उमटले. तर किरण बेदी यांचा पराभव झाल्याची बातमी कळताच कार्यकर्त्यांनी बेंबीच्या देठापासून घोषणा देत केजरींचे अभिनंदन केले.

नेत्याविना जल्लोष
राज्यातील ‘आप’चे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे जल्लोष नेत्याविनाच झाला. नाही म्हणायला अंजली दमानिया होत्या. त्यांनी मध्यंतरी कार्यकारिणीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची आज कोणी विशेष दखल घेताना दिसत नव्हते.