आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाेटेसे अापटा ठरतेय चित्रीकरणासाठी पसंतीचे स्थानक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाॅलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण म्हटले की अनेकांची पसंती असते ती वाई तालुक्याला. मात्र, अाजच्या चित्रपटांत रेल्वे कुठे ना कुठे तरी बघायला मिळतेच. याआधी रेल्वेच्या चित्रीकरणासाठी साधारणपणे मुंबई उपनगरांची निवड केली जायची. मात्र, सध्या पनवेल-राेहा मार्गावर असलेले अापटा हे स्थानक बाॅलीवूडकरांच्या पसंतीचे ठरत अाहे. या स्थानकावर चित्रीकरण झालेल्या ‘बागी’ या चित्रपटाने जवळपास ३२ लाख रुपयांचा महसूल मध्य रेल्वेला मिळवून दिला अाहे. त्याच वेळी सर्वाधिक चित्रीकरणामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसने आपले पहिले स्थान कायम ठेवले अाहे.

लाखाे प्रवाशांनी सतत गजबजलेले असतानाही सीएसटी स्थानकाचा माेह बाॅलीवूडला काही चुकलेला नाही. गेल्या वर्षभरात जवळपास सहा चित्रपटांचे चित्रीकरण हाेऊन त्यातून मध्य रेल्वेला जवळपास १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे. सीएसटी स्थानकावर चित्रीकरण करायचे असल्यास दुपारी एक ते तीन या वेळेत किंवा गर्दी ओसरल्यानंतर रात्री चित्रीकरण हाेते. त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीला अडथळा येत नाही. गेल्या वर्षात ‘स्वच्छ भारत अभियान’ या लघुपटाबराेबरच अरुण साधू यांच्या कादंबरीवर अाधारित 'झिपऱ्या’, अाज की रात टीव्ही मालिका, ढाेलकीच्या तालावर यांचे चित्रीकरण झाले.

साताऱ्याजवळचे ‘वाठार’ नवे अाकर्षण
मध्य रेल्वेवर आपट्यापाठोपाठ येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकालाही चित्रीकरणासाठी अधिक मागणी असली तरी दक्षिण मुंबईत रेल्वेचे यार्ड असणाऱ्या वाडी बंदराचा क्रमांक लागताे. रे राेड, चाैक, काेपरखैरणे, माटुंगा जुईनगर, जसई, लाेकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवरदेखील चित्रिकरण हाेते. मुंबईबाहेर मध्य रेल्वे विभागात येणाऱ्या पुण्याजवळील लोणावळा आणि साताऱ्याजवळील वाठार रेल्वे स्थानक नवे अाकर्षण ठरत अाहेत.

८१ लाखांचा महसूल
२०१५-१६ या आर्थिक वर्षात रेल्वेला चित्रपट, माहितीपट, दूरदर्शन मालिका, जाहिराती या माध्यमातून ८१ लाख २१ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. चित्रपट निर्मात्यांना मध्य रेल्वेवर चित्रीकरणाच्या परवानगीसाठी मध्य रेल्वेने एक खिडकी योजना सुरू केली असून निर्मात्यांना ही प्रक्रिया सोपी करण्याकडे रेल्वेचा भर अाहे. - नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

‘अापटा’ स्थानक मुंबईपासून दूर : आपटा हे स्थानक मुंबईपासून दूर आहे. तिथे गर्दीचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे लाेकल गाड्या येथे तुरळकच येतात. कर्जत येथे चित्रीकरण स्टुडिओ असल्यामुळे आपटा स्थानकाला चित्रपट निर्मात्यांची पसंती असते. आपटा स्थानकावर टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर यांची भूमिका असलेल्या "बागी'चे १३ दिवस चित्रीकरण झाले.
बातम्या आणखी आहेत...